Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बॉक्स ऑफिस वर एक था टाइगर ने तोडले बाहुबलीचे रेकॉर्ड !! ३ दिवसामधे केलि एवढी कमाई ...

Tiger zinda hai
शुक्रवारी प्रदर्शित झालेला एक था टाइगर ह्या चित्रपटाचा पुढचा भाग सलमान खान अभिनीत टाइगर जिन्दा हे ह्या चित्रपटाने ऐतिहासिक बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी त्याने ३४ कोटि १० लाख रुपये कमावले होते, शनिवारी टायगर जिन्दा हे चा गल्ला ३५ कोटि ३० लाख इतका होता तर रविवारी ह्या चित्रपटाने तब्बल ४५ कोटि ५३ लाख रुपये कमवून नविन इतिहास रचला आहे. ११४ कोटि ९३ लाखाची लक्षणीय कमाई ह्या चित्रपटाने ३ दिवसात केलि असून २५ डिसेम्बरची नाताळाची सुट्टी देखील ह्या चित्रपटाच्या पचनी पडेल अशीच चिन्ह आहे.
टायगर जिन्दा हे ला प्रेक्षकांसोबत क्रिटिक्सने पण हिरवा कंदील दिल्याने येत्या १० दिवसात टायगरची जादू काही उतरनार नाहीं असा अंदाज आहे. हां चित्रपट ५०० कोटीचा आकड़ा कधी गाठतो ह्या कडेच सर्वांचे लक्ष्य आहे. अशी आहे टायगर जिन्दा हे ची कथा !
चित्रपटाची सुरुवात हि ४० नर्सेस ला वाचवण्यापासून होते . या मिशनसाठी टायगर आणि झोया यांची निवड झालेली असते . एकूण ४० नर्सेसपैकी १५ पाकिस्तानी आणि २५ भारतीय नर्सेस असतात . आईएसआय ने या नर्सेसचे इराकमध्ये अपहरण केलेले असते . नेमके त्याच वेळेला अमेरिका हे इराकवर बॉम्बहल्ला करणार असतात . अमेरिकेने भारताला त्यांच्या नर्सेस सोडवण्यासाठी एक आठवड्याचा अवधी दिलेला असतो . या एक आठवंड्याच्या आत जर भारत या नर्सेस ला नाही सोडवू शकले तर अमेरिका त्यांचा बॉम्बहल्ला करणार हे नक्की करणार हे निश्चित असते . या अपहरणामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नर्सेस फसलेल्या असल्याने भारत आणि पाकिस्तान एकत्र मिळून हि कारवाई करायचे ठरवतात . त्यामुळे या मिशनसाठी भारताकडून टायगरची निवड होते आणि पाकिस्तानकडून झोयाची निवड होते .
या दोघांच्या ऍक्शन पॅक कामाने भरपूर असलेल्या या चित्रपटात झोया आणि टायगर इराकमधील त्या अतिरेक्यांच्या अड्यापर्यंत कसे पोहोचतात, नर्सेस ला सोडवायला गेलेले असताना ते स्वतः तर नाही न अडकत त्यात या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघावा लागेल .