Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट - टिझर रिलीज !


शिवसेनेचे माननीय खासदार संजयजी राऊत हे माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर एक चरित्रपट बनवत आहेत . या बातमीवर सर्वांची नजर होती कि आता बाळासाहेबांची भूमिका कोण करणार . पण आता ती भूमिका निश्चित झाली आहे . बाळासाहेबांची भूमिका बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि गुणवान कलाकार नावामुद्दीन सिद्दीकी करण्याचे नक्की झाले आहे . या चित्रपटाचे नाव ठाकरे असे ठेवण्यात आले आहे . चित्रपटाचा टिझर नुकताच अमिताभ बच्चन यांच्या हस्ते रिलीज करण्यात आला आहे . या टीझरच्या प्रसंगी उद्धवजी ठाकरे,संजयजी राऊत इत्यादी दिग्गज मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठीतील प्रसिद्ध कलाकार सचिनजी खेडेकर यांनी केले होते . नवबुद्दीन सिद्दीकी हे कामानिमित्त बाहेर असल्या कारणाने ते या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहू शकले .


तरीपण त्यांनी एका विडिओ क्लिप द्वारे आपले मनोगत व्यक्त केले होते . ते म्हणाले कि, प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न आहे कि त्यांनी बाळासाहेबांची भूमिका करावी . ही भूमिका माझ्या वाट्याला आली हे मी माझे खूप मोठे भाग्य समजतो . ज्यावेळेला या भूमिकेसाठी माझी निवड झाली त्यावेळेला सर्वांना खूप मोठा प्रश्न पडला होता कि मी मराठीत बोलू शकेल कि नाही . तेव्हा मी म्हणालो कि बाळासाहेब हेच माझे प्रेरणास्थान आहे . त्यांची आवडती मराठी भाषा तितकेच प्रेम देईल . हे मनोगत त्यांनी शुद्ध मराठीतून दिले . तेव्हा सर्वांच्या माना उंचावल्या .


अमिताभ बच्चन बच्चन यांनी आपले मनोगत व्यक्त केले . ते म्हणाले कि ठाकरे कुटुंबियांशी माझे आपुलकीचे नाते आहे . मी स्वतःला या कुटुंबाचा एक सदस्यच समजतो . या चित्रपटाशी संबंधित कुठल्याही प्रकारचीमदत लागल्यास मी तयार आहे . हा चित्रपट २०१९ ला प्रदर्शित करण्यात येणार आहे . खाली या चित्रपटाचा टिझर देण्यात आला आहे .