Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

टायगर जिंदा है झाला सर्वत्र प्रदर्शित


काल २२ डिसेंबरला टायगर जिंदा है हा चित्रपट प्रदर्शित झाला . या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जाफर यांनी केले आहे . २०१२ मध्ये आलेला एक था टायगरचा हा दुसरा भाग आहे . हा एक ऍक्शन पॅक चित्रपट आहे . अली अब्बास आणि सलमान खान यांनी सुलतान मध्ये याआधी एकत्र काम केले आहे . हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे .

चित्रपटाची कथा : चित्रपटाची सुरुवात हि ४० नर्सेस ला वाचवण्यापासून होते . या मिशनसाठी टायगर आणि झोया यांची निवड झालेली असते . एकूण ४० नर्सेसपैकी १५ पाकिस्तानी आणि २५ भारतीय नर्सेस असतात . आईएसई ने या नर्सेसचे इराकमध्ये अपहरण केलेले असते . नेमके त्याच वेळेला अमेरिका हे इराकवर बॉम्बहल्ला करणार असतात . अमेरिकेने भारताला त्यांच्या नर्सेस सोडवण्यासाठी एक आठवड्याचा अवधी दिलेला असतो . या एक आठवंड्याच्या आत जर भारत या नर्सेस ला नाही सोडवू शकले तर अमेरिका त्यांचा बॉम्बहल्ला करणार हे नक्की करणार हे निश्चित असते . या अपहरणामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या नर्सेस फसलेल्या असल्याने भारत आणि पाकिस्तान एकत्र मिळून हि कारवाई करायचे ठरवतात . त्यामुळे या मिशनसाठी भारताकडून टायगरची निवड होते आणि पाकिस्तानकडून झोयाची निवड होते .या दोघांच्या ऍक्शन पॅक कामाने भरपूर असलेल्या या चित्रपटात झोया आणि टायगर इराकमधील त्या अतिरेक्यांच्या अद्यापर्यंत कसे पोहोचतात, नर्सेस ला सोडवायला गेलेले असताना ते स्वतः तर नाही न अडकत त्यात या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघावा लगेल .

हा चित्रपट काल जगभरात प्रदर्शित झाला . हा चित्रपट तुम्हाला अजिबात निराश नाही करणार .