Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा कोणाच्या सांगण्यावरून सुनील दत्त आले बाळासाहेबांना शरण !

sanjay dutt balasaheb thackeray 

सुनील दत्त हे बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे . सुनील दत्त यांना एक उत्कृष्ट कलाकार म्हणून ओळखले जातात . राजेंद्रकुमार हे त्यांचे सोयरे आहे हे तर आपण सर्वांना माहीतच आहे . राजेंद्रकुमारचा मुलगा गौरवने सुनील दत्तची मुलगी नम्रता बरोबर लग्न केले आहे . सोयरे तर ते आहेच पण त्या व्यतिरिक्त ते एकमेकांचे खूप चांगले मित्र पण आहेत . आज आपण यांच्याविषयी अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत जी खूप क्वचित लोकांना माहित आहे . तर चला मग बघूया अशी कोणती घटना आहे ही.

हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा सुनील दत्त संजय दत्तला १९९३ च्या खटल्यातून वाचवण्याचा प्रयत्न करत होते . ते स्वतः काँग्रेसचे दिग्गज नेते असून पण कोणताही काँग्रेस नेता त्यांचं ऐकतच नव्हता . शेवटी थकून भागून मुंबईच्या घरी पोहोचले . तेव्हा त्यांनी संजय दत्त या सर्वातून बाहेर पडेल हि आशाच सोडून दिली होती . तेव्हा अचानक असे काही घडले कि त्यांना अपेक्षा पण नव्हती .

sanjay dutt balasaheb thackeray
तेव्हा एक दिवस राजेंद्रकुमार त्यांच्या घरी आले . त्यांनी संजयची विचारपूस केली तेव्हा त्यांना समजले कि हे प्रकरण खूप मोठे आहे आणि हे सहजासहजी सुटणारे नाही आहे . मग राजेंद्रकुमार यांनी सुनील दत्त यांना सल्ला दिला कि तुम्ही शिवसेना पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन भेटा . आता फक्त तेच तुमची मदत करू शकतात . पण हि गोष्ट सुनील दत्तांना पसंत नाही पडलं . तेव्हा त्यांनी जवळजवळ किंचाळून सांगितले कि मी नाही जाणार .

तरीपण राजेंद्रकुमार सुनील दत्त यांना म्हणाले कि तुम्ही एकदा थंड डोक्याने याचा विचार करा . तेव्हा राजेंद्रकुमारांनी सुनील दत्त यांना आठवण करून दिली की बाळासाहेबांनी शहेनशहा चित्रपटाच्या वेळी अमिताभ बच्चन यांना कशी मदत केली होती . तेव्हा अमिताभ बोफोर्स कांड मध्ये फसले होते त्यामुळे शहेनशहा सिनेमावर बंदी आणली होती .

दोन-चार दिवसानंतर सुनील दत्तने राजेंद्रकुमारांना फोन करून सांगितले कि ते बाळासाहेबांना भेटण्यास तयार आहेत . पण बाळासाहेबानशी बोलणार कसे ?यावर राजेंद्रकुमार म्हणाले कि तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे मी स्वतः तुम्हाला घेऊन जाईल . फक्त तुम्ही तुमचा संयम सोडू नका . त्यानंतर काही दिवसांनी सुनील दत्त,संजय दत्त आणि राजेंद्रकुमार बाळासाहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या निवास्थानी म्हणजेच मातोश्री येथे गेले . तेथे बाळासाहेबाच्या समोर येताच बाळासाहेब सुनील दत्तांना म्हणाले कि मला माहिती आहे कि तुम्हाला मी आवडत नाही . पण एक काळात मी तुमचा खूप मोठा चाहता  होतो. हे ऐकल्यानंतर सुनील दत्तांच्या खांद्यावरचे ओझे कमी झाले . तेव्हा त्यांचे अश्रू अनावर झाले आणि त्यांना रडू कोसळले .

मग बाळासाहेबांनी विचारले कि सांगा मी तुमच्यासाठी काय करू शकतो ,तेव्हा सुनील दत्त म्हणाले कि कसही करून माझ्या मुलाला वाचवा . तेव्हा बाळासाहेब म्हणाले कि मी तर सत्तेत पण नाही  आहे मग मी कसा काय करू शकतो ? त्यानंतर बरीच चर्चा झाली . मग बाळासाहेब म्हणाले कि बघूया काही शकता. पण हे मी फक्त तुमच्यासाठी करेल संजयसाठी नाही . त्यानंतर त्यांनी संजयला आत बोलावून कडक शब्दात फटकारले आणि सांगितले कि इथून पुढे जसे वडील सांगतील तसेच वागायचे . संजय दत्त ने होकारार्थी मान डोलावली . बाळासाहेबांनी तिघांना भगवा टिळक लावून पाठवून दिले . त्यानंतर आपल्या सर्वांना माहीतच आहे कि काय झाले .