Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

ज्या स्टुडिओ साठी केले सुपरहिट चित्रपट त्याचाच चौकीदार बनून मेला हा महानायक !

आज आपण अशा एक महान कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत जे एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करत होते . आज आपण भारत भूषण यांच्याविषयी जाणून घेणार आहोत . ज्यांची एन्ट्री झाल्यावर चित्रपटगृहात शिट्ट्या पडायच्या. पण नंतर त्यांच्यावर इतकी वाईट परिस्थिती आली कि तुम्ही विचार पण नाही करू शकणार . तर चला मग बघूया असे काय घडले होते त्यांच्याबरोबर .



भारत भूषण यांचा जन्म १४ जून १९२० ला उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला . त्यांना लहानपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करायची आवड होती . पण त्यांच्या वडिलांना ते पसंत नव्हते म्हणून मग त्यांना घर सोडावे लागले . चित्रपटांमध्ये काम करायच्या उद्देशाने भारत भूषण कलकत्याला निघून गेले . त्यावेळेला तेथे मोठमोठे चित्रपट बनत होते . तेथे त्यांना संघर्ष करावा लागला . एक दिवस त्यांच्या कष्टाचं चीज झालं . त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळायला लागले . त्यांना सर्वात मोठा ब्रेक दिला तो म्हणजे केदारनाथ शर्मा यांनी सुहागरात या चित्रपटामध्ये . या चित्रपटात भारत भूषण यांनी गीताबाली यांच्याबरोबर काम केले . हा चित्रपट हिट झाला . त्यांनतर १९५२ साली आलेला बैजूबावरा या चित्रपटाने त्यांना स्टार बनवलं .

हा तो काळ होता जेव्हा भारत भूषण हे सगळ्या मोठ्या अभिनेत्रीन्सोबत काम करत होते जसे मीनाकुमारी,वैजंतीमाला,गीताबाली सारख्यांबरोबर काम करत होते . आता ते चित्रपटांमध्ये अभिनयासोबत निर्माता म्हणूनही काम करू लागले . भारत भूषण यांचे मुंबई व्यतिरिक्त इतर शहरांमध्येही अनेक बंगले होते . महागड्या आणि परदेशी गाड्या पण होत्या . पण काही चुकीच्या निर्णयांमुळे भारत भूषण राजा पासून भिकारी बनत गेले .



गाडी बंगला सगळं काही विकायची वेळ आली . भारत भूषण यांना खूप आर्थिक संकटांना सामोरे जावं लागलं . एक वेळ अशी पण आली कि त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागलं . काही लोक म्हणत होते कि हे सर्व त्यांच्या आणि मीनाकुमारीच्या प्रेमप्रकरणाचा परिणाम मानत होते . चित्रपटात मुख्य कलाकाराची भूमिका तर लांबच राहिली त्यांना छोटे मोठे रोल सुद्धा मिळेनासे झाले होते . त्यांची रोजची खायची सोया मोठ्या मुश्किलीने होत होती . असं म्हणतात कि ज्या स्टुडिओमध्ये गेल्यावर लोक न चुकता सलाम करायचे त्या स्टुडिओमध्ये भारत भूषण यांनी चौकीदाराची नोकरीदेखील केली . याच गरिबीच्या परिस्थितीत एक दिवस भारत भूषण या जगाला सोडून गेले .