Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

प्लॅस्टिकच्या कपात चहा पिणे म्हणजे नपुंसकतेला आमंत्रण !!

आपण बऱ्याचवेळा चहाच्या टपऱ्यांवर प्लॅस्टिकच्या कपात चहा पित असतो . घरात पण आपण प्लास्टिकचे कोटिंग असणाऱ्या ताटात जेवण करतो . पण असं करण आपल्या तब्येतीसाठी खूप हानिकारक आहे . आताच्या ताज्या शोधाच्या अनुसार प्लॅस्टिकच्या कपात चहा पिल्याने आणि प्लास्टिक कोटेड ताटात जेवण केल्याने नपुंसकता येऊ शकते .एका मोठ्या वर्तमानपत्राने ही बातमी छापली आहे . वर्तमानपत्राच्या अनुसार बीएचयू मधील बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटच्या शोधकर्ते प्रो. एस. पी सिंह यांनी त्यावर प्रकाश टाकला आहे . या शोधात असे समोर आले आहे कि प्लॅस्टिकमध्ये कुठल्याही गरम पदार्थाला खाल्ल्याने किंवा पिल्याने त्याच्यातून बीस फिनाले नावाचा रासायनिक तत्व बाहेर पडतो तो नपुंसक बनवतो . उंदरांवर त्याच परीक्षण केल्यानंतरच जाहीर केलं आहे .

शोधात निघालेले निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत . २१ दिवस लागोपाठ ज्या उंदराला बीस फिनाले दिल गेलं त्या उंदराची स्पर्मची मात्रा एकदम कमी होऊन गेली . प्रजनानंतर होणाऱ्या पिलांची संख्या पण निम्मी होऊन गेली . वीस फिनाले ने उंदराच्या जनांग कोशिकांना पण खूप नुकसान पोहोचले होते . या निष्कर्षांच्या जोरावर शोधकर्ता दावा करत आहेत कि हेच नियम मनुष्यांवर पण लागू होतात . त्यांचं असं म्हणणं आहे कि जर मनुष्य प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहा आणि प्लास्टिक कोटेड ताटामध्ये जास्त काळ जेवण केलं तर त्यांचाही  तब्यतीवर त्याचा विपरीत परिणाम होतो .


नपुंसकतेबरोबरच प्लॅस्टिकच्या कपात चहा पिल्याने डायबेटीस,मेंदूवर परिणाम,हृदयाचा झटका यासारखे गंभीर आजार उद्भवतात . प्लॅस्टिकमध्ये बीस फिनाले हे असं एक रासायनिक तत्व आहे जो रक्त कणिकांमध्ये मिसळून धोका निर्माण करतो . त्याचा मानवी शरीरावर हळूहळू परिणाम होतो .