Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

सचिन पेक्षा श्रेष्ठ ठरला असता हा सचिनचा गुरु बंधू ! पण एका चुकीने सर्व संपले ...


आज आपण एका अशा क्रिकेटपट्टूबद्दल जाणून घेणार आहोत जो सचिन तेंडुलकरपेक्षा पण चांगला खेळाडू होता . श्री आचरेकर हे सचिनचे गुरु होते . त्यांनी सचिनला उत्तम क्रिकेट शिकवले होते . तेव्हा मैदानात आचरेकरांनी पहिले कि एक मुलगा सचिनपेक्षा पण चांगला खेळतो . सचिन त्यांच्या कठीण परिश्रमाने पुढे गेले . पण हा खेळाडू मागे राहून गेला . परंतु रमाकांत आचरेकरांचे मत होते कि हा खेळाडू सचिनपेक्षा उत्तम खेळाडू होता . त्यांचे नाव होते अनिल गुरव . असं काय घडलं कि ते काळाच्या ओघात मागे पडून गेले . चला मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी .


आज अनिल गुरव हे मुंबईतील नालासोपाराच्या एका चाळीत खडतर आयुष्य जगतोय . एकेकाळी अनिल गुरव हे श्री रमाकांत आचरेकर यांची पहिली पसंत होते . रमाकांत आचरेकर हे अनिल गुरवला व्हिव रिचर्ड्स म्हणून हाक मारत होते . त्यावेळेला अनिलची फलंदाजी बघायला लोक आपली काम सोडून पाहत होते . हे अनिल गुरव आज एकटे आयुष्य जगत  आहे . स्वतः आचरेकर सचिनला अनिलचा खेळ बघून शिकायला सांगायचे . सचिनदेखील अनिल गुरवचे खूप मोठे चाहते होते . त्यांनी अंडर १४ च्या मॅचमध्ये खेळायला अनिल गुरव यांची बॅट मागितली होती आणि अनिल यांनी मोठ्या प्रेमाने ती दिली . विशेष म्हणजे अनिलच्या त्या बॅटने सचिनने त्याच्या आयुष्यातील पहिले शतक केले होते .

रमाकांत आचरेकरांना पूर्ण विश्वास होता कि अनिल एक दिवस खूप मोठा खेळाडू बनेल . त्यांच्या आईला पण आचरेकरांनी सांगितले होते कि लवकरच तुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे . त्यांच्याकडे जी पारितोषिके आहेत ती या गोष्टीची साक्ष देतात . त्यानंतर अनिलच्या आयुष्यात एक असे वळण आले ज्यामुळे त्यांचे क्रिकेटचे आयुष्य संपुष्टात आले .अनिल यांनी सांगितले कि, त्यांचा भाऊ अजित हा बेकायदा गोष्टींच्या कचाट्यात सापडला होता .त्यामुळे अनिलच्या पण जीवावर बेतले होते . त्यामुळे त्यांनी मैदानावर जण सोडून दिल . त्यानंतर त्यांना पोलीस पण त्रास द्यायला लागले . जेव्हा परिस्थिती सुधारायला लागली तेव्हा त्यांनी  मैदानावर जाण्याऐवजी पैशासाठी टेनिस क्रिकेट खेळायला लागले . गुरु आचरेकरांनी यासाठी विरोधही केला होता . अनिल टेनिस क्रिकेटला त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक मानतात .

अनिल गुरव


काही वर्षांपूर्वी अनिलची आचरेकरांशी भेट झाली तेव्हा तेव्हा ते अनिलवर खूप रागावले होते . अनिल काही वर्षांपूर्वी त्यांचा मित्र किरण मांजरेकर यांच्याबरोबर इस्लाम जिमखान्यावर  सचिनला बघायला गेले होते . त्यांना भीती वाटत होती कि सचिन त्यांना ओळखेल का नाही . पोलीस बंदोबस्तामुळे ते सचिनच्या जवळ नाही जाऊ शकले पण जेव्हा सचिनची नजर आपला मित्र अनिलवर पडली तेव्हा त्यांनी अनिलला ताबडतोब बोलावून घेतले . अनिल गुरव हे सचिनपेक्षा चांगले खेळाडू बनू शकले असते पण परिस्थितीमुळे ते मागे राहून गेले .