Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

अजय देवगण घेणार आहे मराठी चित्रपटांमध्ये एंट्री! बघा कोण आहे अजय सोबत !दिग्दर्शक सतीश राजवाडे ह्यांच्या 'आपल माणूस' ह्या आगामी चित्रपटामधून अजय देवगण मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल ठेवणार आहे. ह्या बाबत ट्विटर वर एका व्हिडीओ द्वारे अजयने ह्याची माहिती दिली. ह्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये नाना पाटेकर,सुमित राघवन आणि इरावती हर्षे असणार आहे तर अजय ची निर्माता म्हणून हा पहिलाच मराठी चित्रपट ठरणार आहे. अजयची पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल हि बंगाली वडील आणि मराठी आई ह्यांच्या संस्कारा मध्ये वाढली आहे पण तिचे बालपण हे संपूर्ण मराठमोळच गेले. त्यामुळे अजयचे मराठी नाते आहेच.

काही महिन्यापूर्वी 'चला हवा येउ द्या' वर 'शिवाय' चित्रपट प्रमोट करायला आल्यावर अजयने त्याला मराठी चित्रपट निर्मित करायचा आहे असे संकेत दिले होते आणि ह्याची सुरुवात होत आहे आपल माणूस ने. नाना सारखा उत्तम नट आणि सतीश राजवाडें सारखा यशस्वी दिग्दर्शक काय जादू घडवता हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. फेब्रुवारी २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ह्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असल्याचे फोटो देखील अजय ने शेयर केले आहे
apala manus marathi movie
"मला फिल्म इंडस्ट्री मध्ये २५ वर्ष पूर्ण झाले असून मी प्रत्येक वेळी नवीन पात्र आणि कथा सादर केली पण तुमच्याशी आपुलकीचे नाते तेच राहिले. तसेच नाते माझे महाराष्ट्रा सोबत आहे अगदी माझ्या जन्मापासून. मला मराठी भाषे बद्दल आदर आहे  असे आपल्या व्हिडीओ मध्ये अजय ने सांगितले पण काजोल शी लग्न केल्यावर ह्या भाषेवर मी प्रेमचं केले जणू. मराठी सिनेमा ला एक वेगळा रसिक वर्ग आहे म्हणून मी आपला माणूस द्वारे ह्या इंडस्ट्री मध्ये पदार्पण करत आहे."