Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

थंडी मध्ये खजूर खाल्ल्याने होतात एवढे सारे फायदे ….फोटो वर click करून बघाच


आपल्या आहारात समाविष्ट असलेल्या फळे,भाज्या आणि सुकामेवा ह्यांच्या प्रमाणामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर आणि प्रामुख्याने शरीरावर खूप फरक पडत असतो. बहुतेकदा आपण एखादा घटक अति प्रमाणामध्ये तर एखादा घटक अत्यल्प प्रमाणामध्ये घेत असतो. एकाच पदार्थामध्ये संपूर्ण आहार मिळणे तसे दुरापास्तच पण एक असे फळ आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व घटक मिळू शकतात आणि हे फळ तुलनेत स्वस्त देखील आहे. हे फळ म्हणजे खजूर ! थंडीत खजूर तसेच खारीक खल्ल्याने त्याचे खूप फायदे आहेत. आज आपण खजूरबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात तसेच फायबर, साखर, आणि ऊर्जेचा एक चांगला स्रोत म्हणजे खजूर. पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खारीक खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरते.

चांगल्या आरोग्यासाठी आणि सदृड शरीरासाठी खारीक अत्यंत उपयुक्त आहे. हिवाळ्यात खारकेचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते. जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते.

थंडी मध्ये खजूर खाल्ल्याने होतात एवढे सारे फायदे

१ हाडे मजबूत बनवून त्यांच्यात सुधारणा :

खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे हाडांची चांगली वाढ होते. तसेच खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्‍ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्‍त असते. स्पॉन्डेलिसिस म्हणजे संधिवाताला खजूर उत्तम !

 त्वचा तजेलदार

२. त्वचा तजेलदार होते आणि उजळते :
खजूर खल्ल्याने त्वचा चांगली राहते. खारीकमध्ये व्हिटॅमिन सी, डी असतात. शिवाय, आपल्या आहार खारका असतील तर  कोणत्याही त्वचाची समस्या जाणवत नाही. अकाली वृ्द्धत्व कमी होते.

 पचन प्रकिया नियमित
३. पचन प्रकिया नियमित होते:

मनुष्याचे आरोग्य हे एका महत्वाच्या गोष्टीवर आधारित असते ते म्हणजे आहार आणि त्याचे योग्य पचन.
रात्री खारीक भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खल्यास ते आरोग्यासाठी खूपच उत्तम. जर भूक वाढवायची असेल खारीक अथवा खजूर दुधामध्ये उकळून घ्या. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, हे पथ्य केले तर भूक वाढते आणि अन्नपचन व्यवस्थित होते.
सर्दीने त्रस्त असाल तर खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूड टाकून सेवन करा. सर्दी लवकर बरी होईल. खारीक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाहीत. शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होईल. 



४. मज्जासंस्था मजबूत त्याची कार्यप्रणाली सुधारते  :

खजूर आपली मज्जासंस्था मजबूत ठेवण्यास खूप मदत करते. ह्यातील जीवनसत्त्वांमुळे मानवी मज्जासंस्थेचे आरोग्य आणि कार्यक्षमता वाढते.  पोटॅशियममुळे मेंदूची गती व दक्षता वाढवण्यासाठी मदत होते. खजूर खल्ल्याने हृदय आणि रक्तदाब पातळी नियंत्रित राहते.

निरोगी गर्भधारणा
५. निरोगी गर्भधारणासाठी :

खजूरामध्ये खनिज, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याने त्याचा लाभ गर्भाला होतो. अर्भकाचे स्नायू बळकट होण्यास भरपूर मदत होते. बाळाच्या जन्मानंतर रक्तस्त्रावाला प्रतिबंध होण्यास फायदा होतो. तसेच गरोदरपणी मुबलक खजूर खाल्ले असता आईला चांगले दूध सुटते. बाळाचे उत्तम पोषण होण्यास मदत होते.