Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

रोज १० जणींवर करायचा बलात्कार, दिल्लीच्या वासनांध बाबाच्या तळघरातून १५० जणींची सुटका !

दिल्ली मधील ढोंगी बाबा वीरेंद्र देव दीक्षित याच्या आश्रमातील तळघरातून अद्यापपर्यंत १५० जणींची सुटका करण्यात आली आहे, अध्यात्माच्या नावावर महिला व अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक माहित ह्यातून समोर आली आहे. ४० हून अधिक मुली अल्पवयीन आहेत. हा बाबा रोज त्यातील १० जणींवर बलात्कार करायचा अशी धक्कादायक माहिती देखील चौकशीत समोर आली आहे.

ढोंगी बाबा दीक्षितचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी आज त्याच्या आश्रमांची झाडाझडती सुरू केली आहे. अध्यात्माच्या आड महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ह्या बाबा बाबत अनेक माहिती उघड होऊ शकते. पोलिसांनी गुरुवारी दिल्लीतील उत्तम नगर येथील आश्रमातून ७० मुलींची सुटका केली. तसेच शुक्रवारी राजस्थान येथील माऊंट अबू त्याच प्रमाणे शनिवारी उत्तर प्रदेशमधील फरुखाबाद शहरातील सिकतर बाग येथील आध्यात्मिक ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या आश्रमावर जेव्हा पोलिसांनी छापा मारला त्यात ५० महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी हि कारवाई केल्या नंतर बातमी वाऱ्यासारखी पसरली असून अनेकांनी राग व्यक्त केला आहे.

पोलिसांनी ह्या बाबाच्या कंपिल येथे गंगा रोडवरील चौधरीयन कॉलनीत उभारलेल्या तीन मजली आश्रमावरही पोलिसांनी छापा मारला. धक्कादायक बाब म्हणजे तेथील तळघरात ३० मुली व महिला चटईवर झोपलेल्या पोलिसांना आढळल्या. ह्या मुलींची चौकशी केली असता यातील काहींनी बाबाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे कबुल केले आहे. मात्र काहीजणींनी मर्जीने आश्रमात राहत असल्याचे सांगितले आहे.
ह्या बाबाला ४ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे