Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

डी.एस.के. गायब - पोलिसांची परराज्यात शोधाशोध !

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि डीएसके ग्रुप ग्रुपचे प्रमुख डी एस कुलकर्णी ह्यांचा मुंबई येथील उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. डी़ एस़ कुलकर्णी हे पत्नीसह गायब झाले आहेत़ अशी शंका असून त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी परराज्यात  आपली पथके रवाना केली आहेत़. ह्याच केस संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने डीएसके यांना १९ डिसेंबरपर्यंत ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले होते़. डीएसके न्यायालयात ५० कोटी जमा करणार का, याविषयी गुंतवणूकदार व फ्लॅटधारक यांच्यामध्ये विश्वास होता तसेच काही जण संशयित देखील होते .

शेकडो गुंतवणूकदार उच्च न्यायालयात आले होते़ आणि १९ डिसेंबरला डीएसके हे स्वत: उच्च न्यायालयाच्या आवारात आल्याचे अनेकांनी पाहिले़. साहजिकच ते न्यायालयात पैसे जमा करण्यासाठी आले असा सर्वांचा समज झाला़. परंतु ते कोल्हापूर येथील एका प्रकरणात सह्या करण्यासाठी ते आले होते़ त्यानंतर ते कोणाच्याही नकळत तेथून निघून गेले़. त्यावेळी उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू न झाल्याने न्यायालयाचा नेमका निर्णय काय हे पोलिसांना समजू शकले नव्हते़.  सायंकाळी वेळ संपत असताना न्यायालयाने आपले म्हणणे स्पष्ट केले़ त्यानंतर डीएसके यांची शोधाशोध सुरू झाली़ तोपर्यंत डीएसके अज्ञातस्थळी रवाना झाले होते़.

न्यायालयाकडून डीएसके यांच्या अटकेचा आदेश मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांची शोध मोहीम हाती घेतली़ पुणे. त्यांच्या वास्तव्याच्या परिसरात त्यांनी बुधवारी शोध घेतला़ . ते कोठेही नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत़ ही पथके राज्यात इतरत्र तसेच परराज्यातही पाठविण्यात आली. हि सर्व माहिती सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनी सांगितली.

दरम्यान डीएसके ह्यांनी सर्वोच्च न्यायालया मध्ये अर्ज केला असून सुट्ट्या असल्याने ५ जानेवारी नंतर त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. झी २४ तास च्या बातमी नुसार ते दिल्ली मध्ये आहेत.