Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

जंगली डुक्करे पळवायला हनी सिंगची गाणे वापरत आहेत हे शेतकरी !


yo yo honey sing

भारत हि खेड्यांची भूमी आहे आहे खेडे म्हंटले कि आजूबाजूला जंगले आलेच. ह्याच जंगलात असणाऱ्या हरीण,तरस,रानगवा आणि रानटी डुक्कर ह्यासम प्राण्यांमुळे शेतामध्ये प्रचंड नुकसान होत असते, ह्या प्राण्यांना वन्य संरक्षण असल्याने त्यांच्या पासून सुटका करून आपले पीक वाचवणे देखील खूप कठीण होऊन बसते. अश्याच समस्येपासून ग्रसित आहेत भारतातील उत्तरेकडील उत्तराखंड ह्या राज्यातील शेतकरी. आधीच तिथे प्रचंड थंडी मुळे बारमाही पीक येत नाही त्यात जंगली डुकरांची समस्या मोठी डोके दुखी ठरत आहे. ह्या समस्येवर येथील शेतकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले पण काही मार्ग सापडेना. उंच आणि सखल भूभाग असलेल्या ह्या प्रदेशामध्ये वनखाते आणि सरकारी गार्ड पण जंगली डुकरांच्या हैदोसा समोर हवाल दिल झाले होते.

uttarakhand style farm
हनी सिंग आला मदतीला धावून !

पण ह्या डुकरांच्या समस्येवर एक अजब उपाय येथील एका शेतकऱ्याला सापडला. पंजाबी रॅप गायक हनी सिंग ह्याची गाणे शेतात जर लाऊड स्पीकर वर मोठ्याने लावली तर जंगली डुक्कर अजिबात ह्या शेताकडे फिरकत नाही हे त्यांनी महिनाभर तपासून पहिले. मग काय सर्व शेतकऱ्यांमध्ये हनी सिंग च्या गाण्याची धूमच झाली, त्याच्या सीडीज ची मागणी देखील वाढली. हनी सिंग प्रमाणे इतर पंजाबी गायकांची गाणी देखील सोबत वाजवण्यात येत असतात.

कसा लागला ह्या उपायांच्या शोध ?

राज सिंग कंवर ह्या शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार जेव्हा त्याच्या घरातील आणि परिवारातील वरिष्ठ मंडळींशी त्याने ह्या प्रश्नाबाबत चर्चा केली तर जिथे मानवी वस्ती अथवा त्याची खूण असेल तिथे हे जनावर येत नाही. मग ह्यावर विचार करत पहिले त्यांनी आग पेटवून ठेवण्याचा प्रयत्न केला पण सतत आग जळत ठेवण्यात खूप समस्या होत्या मग त्यांनी लाऊड स्पीकर चा पर्याय निवडला. सुरुवातीला त्यांनी हिमाचल संगीत आणि जुनी गाणी लावून पहिली पण काही उपाय यशस्वी होईना.
jungle boar
शेवट जेव्हा त्यांच्या मुलाने हनी सिंगची गाणी वाजवली त्या दिवसापासून त्यांच्या शेतात एकदा पण रानटी डुक्कर फिरकले नाही ! हा उपाय इतर शेतकऱ्यांनी देखील वापरला आणि त्यांना देखील ह्यात यश मिळाले आहे. शेवट काय सर्वत्र चार बॉटल व्होडका काम मेरा रोजका हेच ऐकू येत आहे !