Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा का ? दाऊदला ड्रेसिंग रूम मधून धक्के मारून हाकलून दिले ह्या भारतीय कप्तानने !

पल्या भारतात क्रिकेट हा खेळ खूप आवडीने बघितला जाणारा आहे . भारतात क्रिकेट या खेळाचे प्रचंड चाहते आहेत . येथील लोक क्रिकेट खूप आवडीने बघतात . त्यात पण जर भारत विरुद्ध पाकिस्तानची मॅच असेल तर मग विचारूच नका . तेव्हा संपूर्ण भारताचं लक्ष मॅचकडे असत . कपिल देव तर सर्वांचाच आवडता खेळाडू आहे . कदाचित तुम्हाला माहित असेल कपिल देव विषयी एक खळबळजनक गोष्ट समोर आली आहे . याचा खुलासा खुद्द भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगास्कर यांनी केला आहे .
तुम्हाला सर्वांना १९८६ सालची भारत विरुद्ध पाकिस्तानची वर्ल्ड कप  मॅच आठवतच असेल . तेव्हा कपिल देव हे भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार होते . ती मॅच पाकिस्तानने जिंकली होती . पण त्या मॅचच्या दरम्यान अशी एक घटना घडली होती कि ज्यावर कोणाचा विश्वास पण नाही बसणार . तर मग जाणून घेउया कि अशी कोणती घटना होती .
१९८६ ची ती भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होती . तेव्हा सर्व खेळाडू ड्रेसिंग रूम मध्ये बसले होते . तेव्हा अचानक तेथे एक व्यक्ती आला आणि त्याने कपिल देव सोडून इतर सर्व खेळाडूंना बाहेर जाण्यास सांगितले . ड्रेसिंग रूम रिकामा झाल्यानंतर ती व्यक्ती आणि कपिल देवमध्ये संवाद सुरु झाला . त्या व्यक्तीने कपिल देव जवळ एक प्रस्ताव मांडला कि जर टीम इंडियाने ही मॅच जिंकली तर ती व्यक्ती प्रत्येक खेळाडूला बक्षिसाच्या रूपात एक कार देईल . हे सर्व ऐकल्यानंतर कपिल देव यांचा पारा चढला आणि त्यांनी त्याला ड्रेसिंग रूम मधून गेट आऊट असे म्हणून हाकलून लावले . तेव्हा त्यांना माहित नव्हते कि तो कोण आहे.

त्यांनतर ते मॅच खेळायला गेले . तेव्हा पाकिस्तानने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता . तेव्हा भारताने जोरदार फलंदाजी करत २४६ रन्सच टार्गेट पाकिस्तानच्या पुढे ठेवल होत .परंतु दुर्दैवाने भारत ती मॅच हरले . कपिल देव यांना नंतर समजले कि ड्रेसिंग रूम मध्ये त्यांना ऑफर देणारा तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम होता . या घटनेचा खुलासा भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगास्कर यांनी केला होता .