Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

अभिनव उपक्रम: फक्त पाच रुपयात पोटभर जेवण, गरिबांसाठी असलेलं 'राज रोटी सेंटर' !

राज रोटी सेंटर Mulund
सहा चपात्या, भाजी, भात आणि एक केळं असं सर्व काही फक्त ५ रुपयात
शहरात कुणाला उपाशी झोपू द्यायचं नाही..राज रोटी सेंटर ही मानव सेवा आहे .मुंबईत आजही अनेक लोकं आहेत ज्यांना पोटभर अन्न मिळत नाही. शहरातल्या प्रत्येक सिग्नलवर असे अनेकजण आपल्याला पहायला मिळतात. यामुळेच श्रीमद रामचंद्र आत्मतत्व रिसर्च सेंटरनं यावर उपाय काढलाय. शहरात कुणाला उपाशी झोपू द्यायचं नाही. या शहरातल्या प्रत्येकाच्या पोटात अन्न गेलं पाहिजे. यासाठीच मुलुंड आणि माटुंगा इथं 'राज रोटी सेंटर' उघडण्यात आलंय. या उपक्रमाद्वारे सहा चपात्या, भाजी, भात आणि एक केळं असं सर्व काही फक्त पाच रुपयात देण्यात येत आहे.
दोन वेळच्या अन्नासाठी दिवसभर राबावं लागतं. दिवसभर भटकूनही अनेकांना पोटभर अन्न मिळत नाही. श्रीमद रामचंद्र आत्मतत्व रिसर्च सेंटरतर्फे अशाच तळागाळातल्या लोकांसाठी काम करतात अशा लोकांसाठी. कुणी भुकेला राहू नये असं वाटतं. या भावनेतूनच श्री राज रोटी सेंटरची स्थापना करण्यात आलीय.
माटुंगा आणि मुलुंड या दोन ठिकाणी राज रोटी सेंटर सुरु करण्यात आले आहे. मुलुंड इथं गेल्या पाच वर्षांपासून हे सेंटर सुरु आहे. माटुंग्याचं नुकतंच सुरु झालंय. “अशावेळी एकाकी आयुष्य जगणाऱ्या या वृध्दांची खाण्याची फार परवड होत असते. घरी बनवणारं कुणी नाही. वाढत्या वयामुळं त्यांना स्वत:ला बनवताही येत नाही. हॉटेलचं किती दिवस खाणार, त्याने आरोग्याला होणारा त्रास तो वेगळाच. म्हणून अशा वृध्दांना राज रोटी सेंटरतर्फे डब्बा पाठवतो. कमीत कमी पाच रुपये आणि अगदी घरच्या सारखं पौष्टीक जेवण असं असल्यानं त्यांचा आत्मसन्मानही दुखावला जात नाही. गरीब व्यक्तींचं ही तेच आहे. त्यांना सर्व काही फुकटात नको असतं. गरीबांनाही आत्मसन्मान असतोच ..

 

मुलुंड सेंटर सुरु झालं त्याला पाच वर्षे झाली तिथं सकाळी ११ ते दुपारी १ अशी पाच रुपयात फुट पॅकेट घेणाऱ्यांची संख्या चांगली आहे.माटुंग्याचं सेंटर संपूर्णपणे महिला चालवतात. हे अन्न तयार करण्यासाठी लागणारं साहित्य लोकवर्गणीतून येतं. या महिला आपल्या घरचं काम पूर्ण झाल्यावर इथं सेवा देतात. सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत इथं येणाऱ्या प्रत्येकाला अगदी हसऱ्या चेहऱ्यानं फुड पॅकेट देतात. राज रोटी सेंटर ही मानव सेवा आहे. कमी पैश्यात मिळणारं अन्नाचं पॅकेट हाती पडल्यावर या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतो तोच महत्त्वाचा आहे. आता या शहरात कुणी भुकेला राहणार नाही,
Meal in Rs.5 only for needy persons (केवल 5 रूपये मे भोजन-जरूरतमंदो के लिए)
Raj Roti Centre
575 A,Niranjan Parekh Marg, Edenwala Cross Road,
Land mark:- Food Arcade,
*Matunga, Mumbai 400 019.*
For details pls. contact:-_
(1) Naynaben Madia- 9820036976
(2) Jigyaben Gala-9821093339
(3) Smitaben Somaiyya -9820147979
(4) Sarojben Mepani-9833205549
(5) Jaishreeben Doshi-9819763424

लिखाण : Santosh D Patil