Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

स्मिता पाटील ह्यांची अशी अजब इच्छा जी पूर्ण झाली त्यांच्या मृत्यूमुळे !

प्रत्येक चित्रपट अभिनेत्याचा आपला एक अंदाज असतो. आणि अंदाज म्हंटला कि जे प्रमुख नावे डोळ्यासमोर येतात त्यात एक नाव आहे ते म्हणजे अभिनेता राजकुमार! त्यांचे अंदाज त्याकाळी सर्वच जण कॉपी करत असत, अश्याच त्यांच्या एका अंदाज पाहून फिल्म अभिनेत्री स्मिता पाटील ह्यांना धक्का बसला आणि ती गोष्ट त्यांना इतकी आवडली कि त्यांनी पण तसेच करायचे ठरवले.
 
तर असे झाले कि राजकुमार हे त्यांच्या एका चित्रपटाची शूटिंग करत होते आणि ब्रेकच्या मध्ये ते मेकअप रूम मध्ये गेले आणि मेकअप करणे सुरु केले. त्याचवेळी अभिनेत्री स्मिता पाटील देखील त्यांच्या मेकअप रुम मध्ये दाखल झाली पण राजकुमार ह्यांना मेकअप करतांना बघून स्मिता पाटील आश्चर्य चकित झाल्या आणि गोष्टच तशी समोर घडत होती कारण राजकुमार झोपून मेकअप करत होते. ते पाहून स्मिता पाटील ह्यांना खूप विषेश वाटले. त्यांनी पण निश्चय केला कि मी पण असाच मेकअप करवून घेईल. त्यांनी परत आल्यावर त्यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत ह्यांच्याशी ह्याबाबत चर्चा केली.
स्मिता पाटील ह्यांच्या ह्या  हट्टापुढे थोडे त्रस्त झाले आणि स्मिताजींना समजावत बोलले कि असे झोपून मेकअप केल्याने मेकअप नीट बसत नाही आणि राजकुमार ह्यांचा अंदाज वेगळा आहे त्याच्याशी बरोबरी  करु नको, स्मिता पाटील ह्यांनी समजुदार पणे त्यांचे म्हणने ऐकले पण एकदा तरी माझा झोपून मेकअप करवून घेईल. आणि असे झाले देखील स्मिता पाटील ह्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा दीपक सावंत ह्यांनी त्यांच्या झोपलेल्या मृतदेहाचा नववधू सारखा मेकअप केला आणि त्यांची हि इच्छा पूर्ण केली.
१३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या ३१व्या वर्षी स्मिता पाटील ह्यांची प्राणज्योत मावळली