Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

रात्रीतुन भारताची दुसरी सर्जिकल स्ट्राईक, ३ पाकिस्तानी ठार !

मागील वर्षी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा कित्ता गिरवत भारतीय सैन्याने २५ तारखेच्या रात्री पाकिस्तान मध्ये आणखी एक सर्जिकल स्ट्राईक केल्याची माहिती ANI ह्या सरकारी वृत्तसंस्थेने आज दिली आहे. सोमवारी रात्री भारतीय लष्कराने सीमेपलीकडे जाऊन जी कारवाई केली आहे त्यात तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून एक सैनिक जखमी झाला आहे.

Free Army Image

शनिवारी कश्मीरच्या केरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते ज्यात ४ भारतीय जवान शाहिद झाले होते. वारंवार समजावून देखील पाकिस्तान आपल्या नीच वृत्ती पासून बाज येत नसल्याने भारतीय सैन्याने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून यशस्वीपणे कारवाई केली.


पाकिस्तानच्या रावळकोट सेक्टर मधील रुख परिसरात प्रवेश मिळवायला सोमवारी संध्याकाळी भारतीय लष्कराचे एक विशेष पथक पुंछ सेक्टरमधून सीमारेषेपलीकडे गेले. तिथे गस्त घालत असलेल्या पाकिस्तानी जवानांना भारतीय सैनिकांतर्फे कंठ स्नान घालण्यात आले. मृत पाकिस्तानी सैनिक हे ‘५९ बलूच रेजिमेंट’चे होते. हल्ल्यात पाकिस्तानचे आणखी पाच जवानही जखमी झाले आहेत. भारतीय लष्कराच्या दाव्यानुसार या हल्ल्यात पाकिस्तानची आणखी मोठी हानी झाली आहे. पाकिस्तानचे किमान सहा सैनिक या हल्ल्यात ठार झाल्याचा दावा गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनी केला आहे.

 तसेच जम्मू काश्मीरच्या पुलवामा सेक्टरमध्येही भारतीय सुरक्षा दलाने एक दहशतवादी ठार केला असून हा दहशतवादि जैश ए मोहम्मदचा कमांडर नूर मोहम्मद असल्याचे सांगितले जात आहे.