Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

१००० हुन जास्त एन्काऊंटर आणि २००० गुन्हेगार गजाआड - योगी आदित्यनाथ ह्यांची धडक मोहीम

उत्तर  प्रदेश मध्ये सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांनी गुन्हेगारी साठी कुप्रसिद्ध असलेल्या राज्यामध्ये त्यांचा खातमा करायचे कठोर आदेश दिले आहेत. आत्ता पर्यंत २००० हुन अधिक अट्टल गुन्हेगार गजाआड गेले असून १००० हुन जास्त गुन्हेगारांना कंठस्नान घालण्यात पोलीस यशस्वी ठरले आहे. १० महिन्यापासून योगींचें सरकार सत्तेत आहे तेव्हापासून हि कारवाई सुरु झाली आहे.


योगी सरकार ने UPCOCA हा कायदा नुकताच मंजूर केला आहे ज्या नुसार हि कठोर पावले उचलली जात आहे. अंडरवर्ल्ड,खंडणी,मालमत्तेचा कब्जा, वेश्याव्यवसाय, अपहरण, धमकी,स्मगलिंग अश्या सर्व गुन्ह्यांना ह्यात कठोर शिक्षा आहे. योगी आदित्यनाथ ह्यांनी मुख्यमंत्री पदाची शप्पत घेतल्यावर गुन्हेगारांना इशारा दिलेला कि हातात त्यांचे दिवस संपले म्हणून पण लोकांना वाटले कि हे एक राजकीय वक्तव्य आहे पण १० महिन्यात त्यांनी आपले म्हणणे खरे करवून दाखवले आहेएकूण ८९५ झटापटी मध्ये पोलिसांनी १००० हुन अधिक गुन्हेगारांना यमसदनी धाडले आहे. सर्वाधिक ३५८ ठार मेरठ जिल्ह्यात करण्यात आले आहे, नंबर २ वर १७५ च्या आकड्यासह आगरा आहे. बरेली १४९ सह तिसऱ्या स्थानी आहे. ह्या सर्व हालचाली मध्ये २१९६ गुन्हेगार गजाआड गेले आहे. २६ मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांचा पण ह्यात समावेश आहे.
पोलिसांचा पकडल्या गेलेल्या आरोपींबद्दल पण भूमिका अत्यंत कठोर असून त्यांच्यावर रासूका कलम लावण्यात येते आहे. ह्या सर्व हालचाली जो पर्यंत उत्तरप्रदेश चा क्राईम रेट कमी होत नाही तोपर्यंत चालण्याचे संकेत दिले गेले आहे. जनतेने ह्या सर्व कारवाई वर समाधान व्यक्त केले असून ह्या घटनेचे राजकारण होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त होत आहे