Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

या ५ बॉलिवूड कलाकारांचे वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले आहेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये !

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड याला २००० सालच्या आधी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या नावाने ओळखले जात होते . ही दरवर्षी प्रकाशित होणारी मॅगझीन आहे . यामध्ये सगळे वर्षभरातील रेकॉर्ड्सला समाविष्ट केले जाते . तस तुम्ही या बुकमधील समाविष्ट असलेल्या अनेक भारतीयांविषयी ऐकलं असेल . पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल कि यात बऱ्याच बॉलिवूड कलाकारांचे नाव पण समाविष्ट आहे . चला मग बघूया यांचे कुठले रेकॉर्ड केले आहेत .

१. सोनाक्षी सिन्हा 
सोनाक्षी सिन्हा ने वूमेन्स डे वर एकाच वेळेस अनेक लोकांना नेलपेंट लावण्याच्या कार्यक्रमात भाग घेतला होता . या कार्यक्रमात १३२८ महिलांनी एकाच वेळेस आपली नखे रंगवली होती . म्हणून त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे .

२. कुमार सानू 
९० च्या दशकातील प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी एका दिवसात सर्वात जास्त गाणे गाण्याचा रेकॉर्ड केला आहे . म्हणून त्याचे नाव गिनीज बुकमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे .

३. अभिषेक बच्चन 


आपला चित्रपट दिल्ली ६ च्या प्रमोशनदरम्यान एका दिवसात सर्वात जास्त शहरांमध्ये लोकांच्या समोर येण्याचा अभिषेक बच्चनचा हा रेकॉर्ड गिनीज बुकमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे . त्याने १२ तासात गाजियाबाद,नोएडा , फरिदाबाद सिटी वोक , चंदिगढ आणि जुहू या शहरांमध्ये एकाच दिवशी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले होते .

४. अमिताभ बच्चन 
बिग बी अमिताभ बच्चनचे नाव वेगळ्याच रेकॉर्डसाठी गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये निंदावले आहे . त्यांनी १९ वेगवेगळ्या प्रकारच्या गायकांसोबत हनुमान चालीसा गायले आहे .

५. कपूर कुटुंबीय 
१९३१ मध्ये आलेला चित्रपट आलम आरा या चित्रपटात कपूर घराण्यातील पहिले कलाकार पृथ्वीराज कपूर यांनी बॉलिवूडमध्ये अभिनयास सुरुवात केली होती . आतापर्यंत कपूर घराण्यातील २५ लोकांनी बॉलिवूडमध्ये अभिनय केला आहे . बॉलिवूड कलाकारांच्या सर्वात मोठ्या कुटुंबाच्या रूपात त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे .