Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

अमेरिकेतील ५० वर्ष जुन्या चर्चला बदलण्यात आले मंदिरा मध्ये - ठरले मन्दिर बनलेले ५ वे चर्च !

अमेरिकेतील डेलावेर येथील 50 वर्षांच्या चर्चला स्वामीनारायण हिंदू मंदिरमध्ये रूपांतरित करण्यात आले  . गेल्या महिन्यात तेथे प्राण अर्पण सोहळा पण आयोजित करण्यात आला होता

टाइम्स ऑफ इंडिया लेखानुसार, अमेरिकेत हे तिसरे चर्च असेल आहे आणि  जगातील पाचव्या क्रमांकाचे चर्च  आहे जे अहमदाबाद स्वामीनारायण संस्थेमार्फत एका मंदिरात रूपांतरित करण्यात आले . डेलावेअर प्रॉपर्टीच्या आधी संस्थानाने कॅलिफोर्निया आणि केंटकी येथील चर्चही मंदिरांमध्ये रूपांतरित करून घेतले होते . याव्यतिरिक्त लंडनमधील दोन चर्च आणि इंग्लंडमधील मँचेस्टरजवळील बोल्टन यांना संस्थेने  मंदिरांमध्ये रूपांतरित केले आहे.



हार्वॅँड मेनोनाइट चर्च 2014-2015 मध्ये संस्थेने विकत घेतले होते . याच्या नूतनीकरणास जवळपास तीन वर्ष लागले . अशी माहिती वसू पटेल यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली आहे . टेल यांनी सांगितले की, नूतनीकरणादरम्यान दोन शिखर आणि एक घुमट भारतातून बनवून तेथे मंदिराच्या सुशोभीकरणासाठी नेण्यात आला . या प्रकल्पाच्या खर्चाविषयी विचारल्यानंतर पटेल यांनी सांगितले कि 3,000 चौरस फुटाच्याहेण्यासाठी  मालमत्तेची मालकी हक्क घेण्यासाठी आणि नूतनीकरणासाठी एकूण १. ४५ दशलक्ष डॉलर इतका खर्च आला होता . मिळालेल्या अहवालानुसार ते चर्च दैनंदिन वापरात नसल्या कारणाने विकत घेण्यात आले होते .



या संस्थेच्या मंदिराचे महंत भागवत प्रियदास यांनी सांगितले कि या मंदिरात भगवान गर्भगृह, अबजी बापाश्री, मुक्तिजीवन स्वामिभापा, भगवान हनुमान आणि भगवान गणपती यांच्या मूर्तींचा समावेश आहे. ते  पुढे म्हणाले कि , "हे मंदिर सर्वसमावेशक आहे आणि हे पूर्णपणे पवित्र आहे. हे मंदिर फक्त धार्मिक कारणांसाठी नाही वापरले जाणार तर सांस्कृतिक,हस्तकला, नाटक या कार्यक्रमांसाठी पण वापरले जाणार आहे . 1971 साली जेव्हा गुरुदेव मुखजीवन स्वामीबापा अमेरिकेला आले तेव्हा फक्त काही गुजराती तेथे राहत होते .  परंतु त्यांनी त्यांना भारतीय संस्कृती परराष्ट्र भूमीत जिवंत ठेवण्यास प्रोत्साहन दिले. अमेरिकेत वाढत्या हिंदूंच्या मंदिरांमुळे तेथील हिंदू आनंदित आहेत .