Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

ह्या मराठी अभिनेत्रीला आयुष्याचा जोडीदार बनवले आहे दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूने !


आपण नेहमी म्हणतो कि काही जोड्या या एकमेकांसाठी बनलेल्या असतात . ते लोक खूप नशीबवान असतात जे आपला योग्य जोडीदार शोधण्यात यशस्वी होतात . आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक प्रेमकहाणी घेऊन आलो आहोत . या जोडीतील दोघेपण आपल्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचले आहेत . दोघांना पण आपल्या मनासारखा जोडीदार मिळाला आहे . त्यामुळे ते एकमेकांना आयुष्यभर साथ देतील . ते एकमेकांसाठीच बनले आहे . ही कथा साध्या आणि सरळ जोडीची आहे . त्यांची नाव आहेत महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर .

namrata shirodkar mahesh babu


त्यावेळेला महेश आणि नम्रता आपापल्या क्षेत्रात आपली वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न करत होते . तेव्हा त्यांना एकमेकांबद्दल काहीच माहित नव्हते . नम्रताने मिस इंडियाचा 'किताब जिंकला आणि तिच्यासाठी बॉलिवूडची दार खुली झाली . तिने तिचा पहिला चित्रपट सलमान खान आणि ट्वीनकल खन्ना यांच्यासोबत १९९८ मध्ये केला . १९९९ मध्ये तिने तिसरा चित्रपट स्वीकारला जो तेलगू चित्रपट होता त्याचा नाव होत  वामसी.  तेव्हा तिला तिच्या जोडीदाराशी भेटण्याचा मार्ग खुला झाला . वामसी हा महेश बाबुंचा पहिला चित्रपट होता . या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या निमित्ताने नम्रता व महेश पहिल्यांदा एकत्र आले . तेव्हा दोघांनी एकमेकांकर एक चांगली छाप पाडली . चित्रपटाचे शूटिंग पूर्ण व्हायचा आत नम्रता आणि महेश एकमेकांच्या प्रेमात पडले होते .

namrata shirodkar mahesh babu


दोघांचे पाय नेहमी जमिनीवर होते . वयाची अडचण ही दोघांच्या प्रेमात कधीच आडवे नाही आले . नम्रता आणि महेश यांनी त्यांचे हे प्रेमप्रकरण बराच काळ प्रसारमाध्यमांपासून लपवून ठेवले . महेशने त्याच्या घरच्यांना पण सांगितले नव्हते . फक्त त्याच्या बहिणीला त्याचे प्रेमप्रकरण माहित होते. त्यांना त्यांच्या नात्याचा गाजावाजा करायचा नव्हता . शेवटी २००४ मध्ये त्यांनी त्यांचे प्रेम जगजाहीर केले . तेव्हा त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला . १० फेब्रुवारी २००५ मध्ये ते दोघे विवाहबंधनात अडकले . त्यांना आता गौतमकृष्ण आणि सितारा नावाची दोन छान मुले आहेत .


namrata shirodkar mahesh babu