Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा कसे ६० कोटी आफ्रिकी लोकांना वीज पुरवली गायक ऐकोन ने !

Akon Singer

एकोन याला आज कोण नाही ओळखत . हा जगातील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे .त्याने आत्तापर्यंत अनेक प्रसिद्ध गाणे गायले आहेत . एकोनचे गाणी लोक आज पण लोक तितक्याच आवडीने ऐकतात . पण लोकांना फक्त त्यांच्या प्रसिद्ध गाण्याविषयीच माहित आहे . पण त्याच्या सामाजिक कार्याविषयी फार क्वचित लोकांना माहिती असावे .

Akon Electricity Project


आज एकोन लोकप्रिय पॉप संगीत बनविण्यासाठी प्रसिध्द असला तरीही आफ्रिकेच्या  ग्रामीण भागात लोकांना सौर ऊर्जा पुरवण्यासाठी डांसफ्लायर्सला त्याने  ब्रेक दिला आहे . सेनेगाली-अमेरिकन वंशाचे असलेला  गायक यांनी  नुकतेच एक सौर अकादमी उघडले आहे त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण आफ्रिकेतील ग्रामीण भागात ६०० दशलक्ष लोकांपर्यंत सौरऊर्जेद्वारे वीज पुरवण्याचे काम हाती घेतले आहे .

Akon Electricity Project

बामको माली येथील अकॅडमीची स्थापना केली आहे .या अकॅडमीचे एकच  लक्ष होते कि तेथील अभियंत्यांना सौरऊर्जा तयार करण्यासाठी मदत करायची आहे . त्यासाठी या अकादमीने अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यास ही सुरुवात केली आहे . या अकॅडमीचे मुख्य लक्ष हे आहे कि आफ्रिकेतील जे ग्रामीण भाग आहेत जेथे अजूनही वीज पोहोचलेली नाही आहे . त्या मागासलेल्या ग्रामीण भागांपर्यंत वीज पोहोचवायची .

Akon Electricity Project


एकोनची  संघटना म्हणते की या खंडात पृथ्वीला सरासरी 320 दिवस सूर्यप्रकाश मिळतो . एकोन लायटिंग आफ्रिका आणि एकॉन व थिओन नियांग यांच्या सहसंस्थापक असलेल्या सांबा बैथिलीने रॉयटर्सला सांगितले:कि घराघरात वीज पोहोचवण्यासाठी जेवढी वीज तयार करावी लागेल त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आमच्याकडे आहे . आता आम्हाला फक्त  आफ्रिकी तज्ज्ञांना  एकजूट करण्याची गरज आहे. एकोन लायटिंग या अकॅडमीद्वारे आम्ही आफ्रिकेची आणखीन प्रगती करू . जशी आम्ही त्यांना साथ देत आहोत तशीच आफ्रिकेतील लोकांनी आम्हाला तितक्याच उत्साहाने साथ द्यावी हीच आमची अपेक्षा आहे .

Akon Electricity Project