Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

जे भिडे गुरुजींबद्दल बोलतात त्यांची लायकी पण नाही - छत्रपती उद्यनराजे भोसले !

कोरेगाव दगडफेक प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या सर्व प्रकरणाचे सूत्रधार भिडे गुरुजी आहेत असा आरोप भारिप महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे . या सर्व प्रकरणाबतीत उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे . बघूया काय आहे त्यांची प्रतिक्रिया ....

मला हे वेगळं वाटत हे मला पचत नाही . दुःख होते कारण ज्यावेळेला स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण समाजाला बरोबर घेतले होते . मला या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे कि , कोण मराठा? कोण दलित? कोण गुजराती? हा असा जातीपातीचा भेदभाव मानत पण नाही . तरीपण चुकून माकून देवाला प्रार्थना करतो कि कोणाचाही घातपात होऊ नये पण ज्या वेळेस कोणाचा अपघात झाला तेव्हा आपण काय बघतो ब्लड ग्रुप A ,B जे काय असेल ते बघतो . त्यावेळेला आपण असा विचार करतो का कि हे ब्राह्मणाचं आहे का मराठ्यांचं आहे का महाराच आहे बघतो का ? नाही बघत .


असच जर चालू राहील तर महाराष्ट्रच काय तर देशाचे तुकडे व्हायला पण वेळ लागणार नाही !

मग हे जे तेढ निर्माण करणारे लोक आहेत ह्यांना सगळ्या लोकांनी धडा शिकवायला पाहिजे . स्वतःच्या स्वार्थासाठी लोक काय बोलतात याच्याशी मला काही घेणं नाही आहे . हे जे चालला आहे ते सर्व चुकीचं आहे . असच जर चालू राहील तर महाराष्ट्रच काय तर देशाचे तुकडे व्हायला पण वेळ लागणार नाही . हे व्हायचा अगोदर मी मेलेलं बरं कारण मला हे सहन नाही होणार .

भिडे गुरुजी यांच्याबद्दल आदर आहे . त्यांच्या या गोष्टींशी काही एक संबंध नाही आहे . आज जे त्यांच्या विरोधात बोलत आहेत त्यांची लायकी पण नाही आहे . भिडे गुरुजी खरंच ग्रेट माणूस आहे . जितेंद्र आव्हाड हे माझे मित्र आहेत . पण भिडे गुरुजींबद्दल असे वक्तव्य करण्याआधी त्यांनी थोडा विचार करायला हवा होता . जेव्हा उदयनराजे भोसले भिडे गुरुजींना भेटले तेव्हा ते अक्षरशः रडले . भिडे गुरुजी म्हणाले माझा या गोष्टींशी काही संबंध नाही . पुढे महाराज म्हणाले कि मिलिंद पण माझा मित्र आहे मी त्यालापण सांगतो कि उद्रेक होईल असं वक्तव्य करू नका . अशा घटना घडवून आणून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे . माझा एकच म्हणणं आहे कि जातीवादावरून कोणाचंच भलं होत नाही . ह्याने आपलाच नुकसान आहे .