Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

ह्या लोकप्रिय टीव्ही सिरीयल वर येणार आहे सिनेमा आणि त्यात असतील हे मेगास्टार !

Dekh Bhai Dekh Is Coming Back


९० च्या दशकातील अशा बऱ्याचशा मालिका आहेत ज्या आपण आजही विसरलो नाही आहोत . अशाच काही मालिकांपैकी एक आहे ती म्हणजे देख भाई देख . आनंद महिंद्र यांनी निर्मिती केलेली ही मालिका भारतातील सर्वात प्रसिद्ध मालिकांपैकी एक होती . एकत्र कुटुंब पद्धती असलेल्या या मालिकेने लोकांना खूप हसवले होते . जेव्हा या मालिकेचं नाव घेतलं जात तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हसू उमटते . तुम्ही जर आज पण मुंबईतील दिवान कुटुंबाची मज्जा मिस करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत .

Dekh Bhai Dekh Is Coming Back


या भन्नाट विनोदी मालिकेचा एक भाग असणारे कलाकार शेखर सुमन या मालिकेला चित्रपटाच्या रूपात मोठ्या पडद्यावर आणण्याची तयारी करत आहेत . इंडियन एक्सप्रेस या वार्तमानपत्राला मुलाखत देताना त्यांनी स्वतः हा खुलासा केला आहे . मुलाखतीदरम्यान शेखर सुमन यांनी सांगितले कि मी खरंतर मूव्हर्स अँड शेखर ला परत आणण्याची तयारी करत आहे आणि देख भाई देख या मालिकेला चित्रपटाच्या रूपात मोठ्या पडद्यावर आणण्याची योजना आम्ही बनवत आहोत . या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद महेंद्रूच करणार आहेत . फक्त एक दुर्भाग्याची गोष्ट आहे कि या चित्रपटाचे मुख्य पात्रे दादाजी आणि नवीन निश्चल आता आपल्या सोबत नसतील .

Dekh Bhai Dekh Is Coming Back


पुढे बोलताना ते म्हणाले कि मूव्हर्स अँड शेखरला परत आणण्यासाठी त्यांनी त्यांची  बरीचशी काम स्थगित केली आहेत . मूव्हर्स अँड शेखर हा एक वेब शो बरोबरच एक लाईव्ह शो पण आहे . आनंदमहेंद्रू  या चित्रपटात मनोरंजनाचा तडका लावून लोकांना हसवण्याची मोठी तयारी करत आहेत . जी मजा देख भाई देख या मालिकेत होती तीच मजा सिनेमात असेल कि नाही हे बघण्यासारखे असणार आहे . मग तुम्ही तयार आहात ना ?

Dekh Bhai Dekh Is Coming Back