Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

जाणून घ्या ५०० आणि २००० च्या छपाई मध्ये किती येतो खर्च .. वाचा नोटांबद्दल सर्व माहिती !

नोटबंदीचा तो काळ तुम्हा सर्वांना आठवत असेल जेव्हा पंतप्रधांनी जाहीर केले कि आजपासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत . नंतर समजले कि २००० ची नोट आपण atm मधून काढू शकतो . २००० ची नोट हातात घ्यायला सगळे उत्साहित होते . जेव्हा लोकांच्या हातात नोट आली तेव्हा अनेकांची निराशा झाली कारण नोटेचा कागद हा खूपच पातळ होता . काही लोकांना तर २००० ची नोट ही खोटी वाटायला  लागली होती . तुमचा मनात हा प्रश्न आला असेल कि या या पातळ नोटांना छापण्यासाठी किती खर्च आला असेल ? जाणून घ्या किती खर्च येतो आणि कोण छापतात .

यांच्याकडे आहे नोट छापण्याचा अधिकार 
भारतात नोटा छापण्याचा अधिकार RBI कडे आहेत . १ रुपयाची नोट सोडून सर्व नोटा या RBI च्या प्रेसमध्ये छापल्या जातात .

१ रुपयाची नोट छापण्याचा अधिकार यांच्याकडे आहे 
१ रुपयांची नोट आणि नाणे छापण्याचा अधिकार वित्त मंत्रालयाकडे आहे . त्यामुळे १ रुपयाच्या नोटेवर गव्हर्नरच्याऐवजी वित्त सचिवाची सही असते . वित्त मंत्रालय १ रुपयाचे नोट आणि नाणी छापून ते RBI कडे पाठवून देतात .

किती चलन छापायचं आहे हे कसे ठरवले जाते ?
रिझर्व्ह बँक किती मुद्रा छापेल ? हे १९५७ पासून किमान आरक्षण प्रणाली च्या आधारावर ठरवले जाते . किमान आरक्षण प्रणालीमध्ये  RBI २०० करोडची संपत्ती स्वतः जवळ ठेवतात . यात ११५ करोडचे सोने आणि ८५ करोडच्या विदेशी मुद्रा असतात .

नोटबंदीनंतर वाढला खर्च 
नोटबंदीनंतर ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा चालतात नव्हत्या . त्यामुळे  RBI  ला २००, ५०० आणि २००० च्या नोटा जास्त प्रमाणात छापाव्या लागल्या होत्या .

५०० रुपयाच्या नोटा छापायला लागला एवढा खर्च 
वित्त राज्य मंत्री राधाकृष्णन यांच्या अनुसार नोटबंदीनंतर ८ डिसेंबरपर्यंत ५०० च्या एकूण १६५७. ७ करोड नवीन नोटा छापल्या गेल्या आहेत .

५०० रुपयाच्या नोटा छापायला इतका आला खर्च 
५०० रुपयाच्या ११६९५.७ करोड नोटा छापायला RBI ने  १२९३.६ करोड रुपये खर्च केले आहेत . म्हणजे १नोट छापायला त्यांना २. ९४ रुपये इतका खर्च आला होता .

२००० रुपयाच्या नोटा छापायला लागला इतका खर्च 
नोटबंदीनंतर आत्तापर्यंत RBI द्वारा २००० रूपपायाच्या एकूण ३६५. ४ करोड नोटा छापल्या गेल्या आहेत . ज्यांना छापायला एकूण १२९३. ६ करोड रुपये खर्च आला आहे .