Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

हे आहे डॉक्टरांच्या खराब अक्षर असण्याचे खरे कारण !

Doctor Bad Handwriting


जीवनात कधी न कधी प्रत्येकाला डॉक्टरकडे जावं लागत . जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला प्रस्क्रिपशन लिहून देतात . ते अतिशय खराब अक्षरात असते . तेव्हा आपल्या मनात विचार येतो कि एवढ्या शिकलेले डॉक्टरांचे अक्षर खराब का असते ?आज आम्ही तुम्हाला त्याचे खरे कारण सांगणार आहोत .

Doctor Bad Handwriting


सामान्य लोकांना डॉक्टरच प्रीस्क्रिशन वाचणं खूप अवघड असत. ते फक्त एखादा मेडिकलवाला किंवा दुसरा डॉक्टरच समजू शकतो . पण मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या अनुसार डॉक्टरांना अशी सूचना दिली गेली आहे कि त्यांनी त्यांचे प्रिस्क्रिपशन स्पष्ट आणि मोठ्या अक्षरात लिहावे आणि  डॉक्टरांनी आपल्या रुग्णाला प्रिस्क्रिपशनमध्ये काय लिहिला आहे ह्याची सविस्तर माहिती दयायला हवी कि कोणते औषध कुठल्या आजारासाठी आहे आणि त्याचे नाव काय आहे . तरीपण जास्त  करून डॉक्टर असं करत नाही आणि प्रिस्क्रिपशन रुग्णांसाठी एक कोडे बनून जाते . चला मग या कोडी बनलेले प्रिस्क्रिपशन आणि खराब अक्षरमागचे कारण जाणून घेऊया .

Doctor Bad Handwriting


प्रत्यक्षात जेव्हा एका महिला डॉक्टरला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिले कि , डॉक्टर व्हायच्या आधी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागते . कारण त्यांना खूप कमी वेळात मोठमोठ्या परीक्षा द्यायच्या असतात . त्यामुळे पटापट लिहायची सवय होऊन जाते म्हणून खूप पटापट लिहिल्याने त्यांचे अक्षर खराब येते . ते सामान्य लोकांच्या लक्षात येत नाही .

Doctor Bad Handwriting


यासोबत दुसरा प्रश्न असा आहे कि केमिस्ट आणि मेडिकलवाल्यांना इतके खराब अक्षर कस काय समजते . तर मग याच उत्तर असं आहे कि , जास्त करून डॉक्टर हे पटापट लिहिण्यासाठी काही कोडचा वापर करतात . त्यामुळे हे कोड फक्त मेडिकल व्यवसायात असलेला व्यक्तीच समजू शकतो . मेडिकलवाल्यांची याबतीत प्रॅक्टिस झालेली असते कि कोणत्या औषधाचं काय नाव आहे आणि त्याला कसे लिहितात .  आहे कि आपण जेव्हा मेडिकलमध्ये जाऊन प्रिस्क्रिपशन दाखवतो तेव्हा तो पटकन नाव वाचून आपल्याला सांगतो .