Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

जिवंत आहे हा मुलगा ... आपल्या सगळ्यांना काढलं येड्यात !


गेल्या आठवड्यात एक भयानक विडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता . एक हैद्राबादचा विद्यार्थी त्यात तो रेल्वे ट्रॅक वर उभा राहून राहून सेल्फी काढत आहे आणि अचानक त्याला ट्रेनने उडवले . हा विडिओ संपूर्ण फेसबुक आणि व्हाट्सअप ग्रुपवर फिरत होता . हा विडिओ बऱ्याच ठिकाणी व्हायरल झाला होता . विदेशातील बातम्यांमध्ये पण तो झळकत होता . फक्त भारतातच नाही तर विदेशात पण ते व्हायरल झालं होत . पण हा मुलगा एकदम सुखरूप आहे . ह्याच्या केसाला पण धक्का लागलेला नाही . हे होते ते बनावट विडिओ
पण आता हे सत्य समोर आले कि ते विडिओ खोटे होते . हा विद्यार्थी हैद्राबादचा राहणारा असून ह्याचे नाव शिवा आहे . तो हैदराबादमधील मदापूर येथील  एका जिममध्ये जिम इन्स्ट्रक्टर आहे . ट्विटर वर एका विडिओ मध्ये त्याने आणि त्याचा मित्रांनी स्पष्ट केले आहे . हे विडिओ फक्त लोकांना येड्यात काढण्यासाठी बनवले होते . एबीएन न्यूज चॅनेल मध्ये काम करणाऱ्या पत्रकारितेने ट्विटर वर एक नवीन विडिओ टाकला आहे त्यात शिवा त्याच्या मित्रांसोबत ट्रेनच्या सेल्फीची मजाक उडवत आहे .