Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा कोण आहे हा गोल्ड मॅन ! त्याचे सोन्याचे बूट,मोबाईल,गाडी आणि लाईफ स्टाईल ..

महाराष्ट्रात सोन्याचे अनेक चाहते आहेत . काही लोकांकडे सोन्याचं शर्ट आहे तर काही लोक कितीतरी सोन अंगावर परिधान करतात . यातूनच एका व्यक्तीचे नाव पुढे आले आहे तो म्हणजे सनी वाघचौरे . सनी आपल्या शरीरावर कितीतरी तोळे सोने परिधान करतात . सनी स्वतःला सोन्याचे सर्वात मोठे चाहते मानतात . त्यांच्याकडे सोन्याचा फोन आणि सोन्याचे बूट पण आहेत.


विवेक ओबेरॉय आहेत सनीचे मित्र 
सनीचे बॉलिवूडमध्ये चांगली ओळख आहे . अभिनेता विवेक ओबेरॉय त्यांचे चांगले मित्र आहेत . सनी त्यांच्या मित्राबरोबर कपिल शर्माच्या शोमध्ये पण येऊन गेले आहेत . सनी आपल्या गळ्यामध्ये सोन्याची चेन, हातात सोन्याचं कढ, ब्रेसलेट आणि सोन्याचं घड्याळ घालतात . एवढेच नाही तर त्यांच्याकडे सोनेरी रंगाची ऑडी आणि सोन्याचे बूट पण आहेत . त्यांचा आयफोन पण गोल्ड प्लेटेड आहे . सनी सांगतात कि त्यांना लहानपणापासूनच सोन्याची आवड होती . म्हणून मी एवढं सोन शरीरावर परिधान करतो .

पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात राहणारे सनी आपल्या सोन्याच्या सुरक्षेसाठी आपल्या सोबत नेहमी दोन सुरक्षारक्षक घेऊन फिरतात .

महाराष्ट्रात पहिले पण झाले आहेत गोल्डमॅन 
महाराष्ट्रात याआधी पण गोल्डमॅन झालेले आहेत . यात सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे दत्ता फुगे यांचे . दत्ता फुगे यांनी ३. ५ किलो सोन्याचा शर्ट बनवला होता . नाशिकमध्ये राहणारे पंकज पारेख हे आपल्या शरीरावर ४. १ किलो सोने परिधान करतात . त्यांच्या सोन्याच्या शर्टाची नोंद गिनीज बुक मध्ये केली आहे . महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सम्राट भाऊ मोझे हे आपल्या शरीरावर कित्येक किलो सोने परिधान करतात .