Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा का झाला डॉक्टरेट मिळवलेला भारतीय हिजबुल मुजाहिद्दीनचा आतंकवादी !

हिजबुल मुजाहिदीन नावाच्या दहशतवादी संघटनेमध्ये सामील झाला अम्मू चा हुशार विद्यार्थी मान्नान वाणी


अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या एका हुशार विद्यार्थ्याने एक अजब प्रकार केला आहे . तो हिजबुल मुजाहिदीन नावाच्या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे . या विद्यार्थ्यांचे नाव मान्नान वाणी असे आहे . या घटनेची माहिती मिळताच अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीने त्याला महाविद्यालयातून काढून टाकले आहे . मान्नान ज्या हॉस्टेलमध्ये राहत होता त्या हॉस्टेलमध्ये पोलिसांनी छापा मारला . तेव्हा त्यांनी अनेक संशयास्पद गोष्टी जप्त केल्या आहेत . त्यामुळे युनिव्हर्सिटीने पण त्याला कॉलेजमधून काढून टाकले आहे .

मन्नानचा हातात बंदूक असलेला फोटो होतो आहे व्हायरल 

सध्या मन्नानचा ak-४७ हातात धरलेला फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे . मन्नान वाणी  अलिगढ मुस्लिम विद्यापीठात अप्लाईड जिऑलॉजीमध्ये पीएचडी करत होता . २ जानेवारीपर्यंत तो महाविद्यालयात उपस्थित होता पण नंतर त्याने सोडून दिले . मन्नान वणी हा  दक्षिण काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील लोलाब गावाचा रहिवासी  आहे. त्याने  अलिगड विद्यापीठात पीएचडी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला होता . एएमयू प्रशासनाने सांगितले की, चौकशीनंतरच सत्य काय आहे हे आम्हाला कळेलच पण मन्नान वणी  याच्याविषयी संशयास्पद असं काही ऐकण्यात आलेलं नाही .

 
पोलिसांनी मारला छापा 

अलिगढ एसएसपीने आपल्या टीमसह एएमयूचे हबीब हॉस्टेलवर छापा मारला होता, जिथे मन्नान राहत होता . सएसपी राजेश कुमार पांडेय म्हणाले कि मन्नानच्या खोलीतील सर्व सामान जप्त करण्यात आले आहे आणि आता पुढील कारवाई सुरु आहे . त्तर प्रदेशच्या एडीजी (कायदा व सुव्यवस्था) आनंद कुमार यांनी सांगितले की, आमहाला फेसबुकवरून काही माहिती मिळाली आहे . पण त्यातून अजून काही निष्कर्ष काढला गेलेला नाही आहे . जो फोटो मिळाला आहे तो खरा आहे कि खोटा यांची पण चौकशी चालू आहे .

विद्यार्थ्यांचे काय म्हणणे आहे 

जिओलॉजी विभागातील विद्यार्थ्यांनी सांगितले की, "मन्नान हा अभ्यासात खूप हुशार होता. तो 2012 पासून येथे शिकत होता . गेल्या आठवड्यापासून तो  कॅम्पसमध्ये दिसत नव्हता . मन्नान वणी अशा प्रकारचा विद्यार्थी अजिबात नव्हता . सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल झाला आहे तो खोटा पण असू शकतो . एएमयूला बदनाम करण्यासाठी मुद्दाम कोणीतरी हे केलं असावं . विभागाचे अधिकारी याबद्दल काहीही बोलण्याचे  टाळत आहेत.