Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

फेसबुकवर वावरतांना महिलांनी काय करावे ? काय करू नये !!!

फेसबुकवर वावरतांना महिलांनी  काय करावे ?

एफ बी वर वावरताना… महिलांनी काय करावे ? काय करू नये !!!
********************************
१) आली कोणा देखण्याची रिक्वेस्ट कि लगेच घे त्याला आत, असे करू नये !! 
(प्रोफ़ाइल फोटो स्वतःचा असला तरी फोटोशॉप मध्ये (फेयर and लव्हली) इफेक्ट देता येतो !! 
त्यामुळे देखणेपणाची व्याख्या नीट करावी


२) ज्या पुरुषांचा प्रोफ़ाइल फोटो त्याच्या "अधिकृत" बायडी सोबत असेल त्याची रिक्वेस्ट बिनधास्त घ्या !!
(दुनिया का सबसे निरुपद्रवी प्राणी वोही होता है )


३) ज्याचे संपूर्ण नाव प्रोफ़ाइल सोबत असते, ते सुद्धा बरे असतात. एकदम शामळू नसतात पण फार त्रासदेखील देत नाहीत !!


४) "दिलजले"…. एक वेडा xxxx, मी अमुक तमुक असले टोपण नावे घेतलेले शक्यतो बाहेर ठेवा.
(कारण ते स्वतःच्याच तंद्रीत असतात, तुम्ही काय म्हणताय याकडे त्यांचे फार कमी लक्ष असते. म्हणून अविवाहित मुलीनी तर काळजीपूर्वक अशा वेळी जागे राहावे. टोपणनावात सगळे गोड गोड आणि रोम्यांटिक असले म्हणजे प्रत्यक्षात असतेच असे नाही !! घरून जोरात दम भरला गेला तर यांची कढी पातळ होऊ शकते !! डेरिंग राहिले बाजूला, हे पटकन अकौंटच बंद करतात.) त्यामुळे चार दोन महिने यांच्याकडे दुरून लक्ष ठेवा. नंतर मनात भरलाच तर विचार करा !!


५) नावामागे एखादी डिग्री लावलेले प्रोफ़ाइल असेल (उदा. डॉ,…. सी ए, Adv ) तर नक्की हे लोक लीस्ट मध्ये घेण्यासारखे असतात. (कारण त्यांचे त्याच्या प्रोफेशनवर जास्त प्रेम असते. आणि ज्यांचे त्यांच्या कामावर असे प्रेम असते ते मनाने बरेच बरे असतात. उगीच फालतू "हाय, ह्यलो" करून सकाळी इन बॉक्सला त्रास देत नाहीत.)
उलट त्यांच्या प्रोफेशन ची माहिती आपल्याला ते देवू शकतात. आपले अज्ञान दूर होऊ शकते !!
६) पंचवीस वर्षे ते पुढे कितीही वर्षे असलेल्या कोणत्याही पुरुषाची कधीच खात्री नसते. म्हणजे चांगल्या किंवा वाईट अर्थाने सुद्धा !! चांगल्या अर्थाने म्हणजे, तुम्हाला वाटेल पन्नाशीचा आहे तर तो तुम्हाला मदतीला येईल !! तर त्याला त्याचे घोंगडे जड झालेले असते. ते तो पाहणार का तुम्हाला पाहणार ?? आणि वाईट अर्थाने म्हणजे, "बंदर चाहे कितना भी बुढा हो, गुलाठी (कोलांटी उडी) मारना नही भूलता !! हे महिलांनी लक्षात घ्यावे !!

७) ज्याची फ्रेंड लिस्ट जास्त तो सगळ्यात भारी नसतो !!
तर त्याचा गोतावळा कसा आहे, रोज तिथे कसल्या कॉमेंट सुरु असतात यावर सगळे अवलंबून आहे. तुम्ही त्यांच्या लीस्ट मध्ये जाल देखील पण (तुम्ही कितीही सुबक ठेंगण्या असला तरी) तो तुमची दखल फार घेईल असे नाही !! त्यातून तुमचा मूड जावू शकतो !!


८) ज्याच्या प्रोफ़ाइलमध्ये डोळ्यावर गॉगल आहे, त्यापासून सुरुवातीला जरा चार हात लांबच राहा !! कारण गॉगल आप कमाईचा बाप कमाईचा ? हे कळायला वेळ लागतो न !! म्हणून !!


९) महिलांनी स्वतःहून एखाद्याला रिक्वेस्ट पाठवायला काहीच हरकत नाही !! मात्र त्या आधी आठ दिवस त्या बाबाच्या भिंतीवर फिरत राहा !! तो कसा आहे, कॉमेंट कसा करतो, त्याचे मित्र कसे बोलतात ते पहा आणि मग थोडे दिवस "फोल्लो" ऑप्शन सिलेक्ट करून ठेवा. महिन्या भराने खात्री झाल्यावर मगच रिक्वेस्ट पाठवा !!


१०) ज्या पुरुषाची बायडी आधीच तुमच्या लिस्टमध्ये आहे, त्या पुरुषाची रिक्वेस्ट बिनधास्त घ्या !! कारण तो काय टिपू सुलतान नसतो. तो कुठे कुठे फिरतोय हे त्याची बायडी पाहत असतेच मग तुम्ही वेगळी काळजी कशाला करायची ??


११) कॉमेंट मधून केवळ "दादा" भाई…. म्हटल्याने नाते निर्माण होत नाही आणि रिस्क देखील कमी होत नाही !!
तर त्यासाठी मन स्वछ असावे लागते !! ते असल्यावर मग असल्या दादा, काका, भाई म्हणायची गरज पडत नाही !! हे लक्षात ठेवा !!

अर्थात वरील निष्कर्ष हे माझे स्वतःचे आहेत !! त्यात चूक होऊ शकते !!
आणि शेवटी माझा एखादा निष्कर्ष चुकीचा निघाला तर "नियमाला अपवाद" असतात असे म्हणायचे आणि पुढे जायचे !!