Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

चेहऱ्यावरील हिजाब काढून सोशल मीडियावर इराणी महिलांनी घोषित केले स्वातंत्र !

Iran Protester Arrested for Taking Off Hijab

इराण मधील तेहरान शहरात एका महिलेने चेहरा झाकायचा हिजाब काढून तो काठीवर लटकावत झेंड्यासारखा फडकवून निषेध नोंदवल्याचा व्हिडीओ काल ट्विटर वर व्हायरल झाला आहे. १९७९ च्या आधी इराण मध्ये महिलांना संपूर्ण स्वातंत्र पणे आपले जीवन व्यतीत करत होत्या. परंतु १९७९ नंतर इराण मध्ये इस्लामी शासन आल्यानंतर तिथे महिलांना ड्रेस कोड करण्यात आला. परंतु जागतिकीकरण आणि व्यक्ती स्वातंत्र्याची जाणीव झालेल्या एका इराणी महिलेने हे धाडसी पाऊल उचलले आणि त्यानंतर फेसबुक वर इराणी महिलांनी हिजाब शिवाय फोटो शेयर करून त्यांना वाटणाऱ्या जाचक धार्मिक रूढी विरुद्ध एक सोशल युद्ध सुरु केले आहे.


Iran Protester Arrested for Taking Off Hijabमहिलेला झाली आहे अटक !

हे कृत्य केल्यावर सदर महिलेला एक हिरो म्हणून बघितले जात आहे, पण ह्या कृत्याचा व्हिडीओ ज्यांनी ट्विटर वर शेयर केला त्या अर्मीन नवाबी ह्यांचे म्हणणे आहे कि "त्या शूर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटक केली आहे"
आधीच इराण मध्ये नागरिक आणि प्रशासन ह्यांच्यात मोठा संघर्ष चालू आहे. मागील महिन्यात २९ बळी गेले आहे पण शक्यतो पुरुषच लढा देतांना दिसत होते त्यात आता ह्या कृत्याने महिला देखील सामील झाल्याने सरकार सतर्कतेचा स्थिती आल्याचे चित्र आहे.