Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

करणी सेनेच्या प्रवक्त्याची जीभ घसरली, वृत्तनिवेदकाला हाका मारले त्या नावाने .. बघा पुढे काय झाले !

Karni Sena Leader Called News Anchor As Baby

आज सहज असे म्हणता येईल कि संजय लीला भन्साळी यांचा पद्मावती हा आतापर्यंतचा सर्वात वादग्रस्त हिंदी चित्रपट ठरला आहे . शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून ते चित्रपटगृहात चित्रपट लागल्यानंतर पण ह्या चित्रपटावरचा वाद अजून निवळलेला नाही . उलट दिवसेंदिवस त्याचा निषेध वाढत चालला आहे . या चित्रपटाच्या विरोधात असलेल्या संघटना यांनी एका शाळेच्या बसवर हल्ला केला आणि त्या बसमधील लहान मुले व शिक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला .

Karni Sena Leader Called News Anchor As Baby


या घटनेमुळे लोकांच्या मनात आंदोलनाविरुद्ध राग निर्माण झाला आहे . प्रसारमाध्यम या संघटनेच्या म्होरक्यांना कठोर शब्दात प्रश्न विचारात आहे . राज्य सरकार करणी सेनेसारख्या संघटनांवर कठोर कारवाई पण करत नाही आहे . आपण करणी सेना आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या निषेधांविषयी बातम्यांमध्ये वाचले आणि पहिले असेल आणि तुम्ही विचार केला कि असे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून त्यांना काय मिळाले असेल .

एकीकडे करणी सेने त्यांची राणी पद्मावतीच्या मानाचे रक्षण करण्यासाठी चित्रपटाचा निषेध करत आहेत तर दुसरीकडे न्यूज चॅनेलच्या महिला निवेदक यांना बेबी म्हणून त्यांना अपमान करत आहेत . न्यूज एक्स चॅनेलच्या प्रसिद्ध निवेदक संजना चौहान या करणी सेनेचे सहकारी सुरजपाल अमु ह्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी तिला बेबी नावाने हाक मारून धक्काच दिला .

Karni Sena Leader Called News Anchor As Baby


त्यावेळेला ती निवेदक संतापली आणि म्हणाली कि ह्या लोकांना महिलांबद्दल कुठल्याही प्रकारचा आदर नाही आहे आणि त्या निवेदकाने माफी मागण्यास सांगितले . पण सुरजपाल अमु यांनी माफी मागण्यास नकार दिला आणि आपला माईक आणि स्क्रीन बंद करून चर्चेतून बाहेर पडले . यासंबंधित खाली विडिओ दिला आहे .