Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

पवार आडनाव काढा ,बारामतीत कुत्रासुद्धा विचारणार नाही - निलेश राणे

Nilesh Rane Got Angry


अजित पवार यांनी केलेली टीका ही निलेश राणे यांच्या चांगल्याच जिव्हारी लागली आहे असे दिसत आहे . त्यामुळे निलेश राणे यांनी ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे .
हल्लाबोल यात्रे निमित्त अजित पवार हे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले होते . शनिवारी त्यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली होती . त्यानंतर नारायण राणे यांचा चांगलाच समाचार घेतला . आगीतून निघून फुफाट्यात पडावे अशी अवस्था राणेंची झाली आहे . भाजपचं निवडणूक चिन्ह बदलून गाजर ठेवावे असा टोला लगावला होता . या सभेत पुढे त्यांनी नारायण राणे यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली होती . ते बोलले कि माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका मला मंत्री करा असे म्हणत ते मंत्रिमंडळात प्रवेशाची वाट बघत बघत हताश झाले .ही टीका निलेश राणे यांच्या चांगल्याच जिव्हारी लागली . संतप्त निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून अजित पवार यांच्यावर जबरदस्त हल्ला चढवला आहे . ते म्हणाले कि नारायण राणे यांनी आत्तापर्यंत जेवढी पदे मिळवली ती स्वतःच्या बळावर मिळवली आहेत . तुमच्यासारखी फुकट नाही मिळवली आहेत . तुम्ही तुमच्या नावातून फक्त  पवार आडनाव काढा मग बघा बारामतीत तुम्हाला कुत्रादेखील विचारणार नाही . इथून पुढे जर राणे साहेबांना एकेरी नावाने हाक मारली तर तुझे रात्रीचे सर्व कार्यक्रम जगजाहीर करू असा इशारा निलेश राणे यांनी अजित पवार यांना दिला आहे .