Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

व्हिडीओ : पाकिस्तानी म्हणून निर्वस्त्र केले जाते, भारतीयांना देतात चांगली वागणूक - पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर !

Saba Qamar


पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिने फक्त पाकिस्तान नाही तर भारतातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे . पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिची गणती पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींनमध्ये केली जाते . पाकिस्तानी अभिनेत्री हिने बॉलिवूडमध्ये इरफान खानसोबत हिंदी मीडियम या चित्रपटात कामही केले आहे . या वेळेला सबा कमर ही तिच्या एका विडिओ मुळे सध्या चर्चेत आली आहे . हे विडिओ सध्या मीडिया मध्ये खूप व्हायरल होत आहे . या व्हिडिओमध्ये सबा कमर हिने रडत रडत आपले दुःख व्यक्त केले आहे .

Saba Qamar


हे विडिओ पाकिस्तानमधील एका टीव्ही चॅनेलसाठी मुलाखत देतानाचे आहे . या व्हिडिओमध्ये ती खूप रडताना दिसत आहे आणि डोळ्यातून पाणी येत असताना ती आपली कहाणी सांगत आहेत . पाकिस्तानी चॅनेलला मुलाखत देत असताना आपण पाकिस्तानी असल्याचं वाईट वाटत असं मत व्यक्त केलं आहे . तिने सांगितले कि एक पाकिस्तानी असल्यावर जगासमोर काय वाटत . सबा कमरने बॉलिवूडमध्ये एकच चित्रपट केला आहे पण ती पाकिस्तानची महागड्या अभिनेत्रींनपैकी एक आहे . सबा कमरच्या या व्हायरल व्हिडिओला बघून कोणीही भावुक होऊन जाईल .

व्हायरल होत असलेल्या ह्या व्हिडिओमध्ये सबा ने सांगितले कि पाकिस्तानला एक पवित्र जमीन मानली जाते. आपण पाकिस्तान झिंदाबादचे नारे पण लावतो . पण आपण जेव्हा दुसऱ्या देशांमध्ये जातो तेव्हा संपूर्ण विवस्त्र करून तपासणी केली जाते .

Saba Qamar

 

ती एकदा भारतीयांसोबत शूटिंगला गेली होती तेव्हा भारतीय लोकांना अगदी सहजतेने एरपोर्टवर जाऊ दिले . पण मला थांबवून ठेवले आणि माझी कडक तपासणी केली गेली . त्याच कारण फक्त एकच होत कि मी पाकिस्तानी आहे . दुसऱ्या देशांमध्ये आपली काय इज्जत आहे हे या गोष्टीवरून दिसून येते . असे मत त्यावेळेला तिने व्यक्त केले .