Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

अजून ८१ वर्ष बघावा लागेल सूर्यवंशम सेट मॅक्स वर जाणून घ्या त्यामागचे कारण !

Suryavansham


प्रत्येक गल्लीत लहान मुलं रडत असतात . तेव्हा त्यांच्या कानांवर एक गोड आवाज पडतो . त्या गोड आवाजाने लहान मुलांचं रडणं बंद होऊन जात . तो आवाज असतो हिरा ठाकूरचा ज्याला त्याचे वडील काहीच किंमत देत नसतात . हे दृश्य आहे सेट मॅक्स वर सारखा सारखा दाखवला जाणारा चित्रपट सूर्यवंशम या मधील . बहुधा तुम्ही हा चित्रपट पहिलादेखील असेल . नसेल बघितला तरी चिंता करण्याचे काही कारण नाही . कारण हा चित्रपट सेट मॅक्स वर लागतंच राहणार . तुमच्या शेवटच्या क्षणी पण तुम्ही या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात . या चित्रपटाला तुमचे मुलं पण बघू शकतील आणि पुढे जाऊन नातवंड पण बघतील . हा चित्रपट सेट मॅक्स वर सारखा सारखा का दाखवला जातो याचे खरे कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत .

Suryavansham


हा टीव्हीवर सर्वात जास्त वेळा दाखवला गेलेला चित्रपट आहे . पण हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा फ्लॉप गेला होता . सेट मॅक्स वर सूर्यवंशम इतक्या वेळा दाखवला गेला आहे कि आता लोक त्यावर विनोदही बनवायला लागले आहेत . सूर्यवंशम हा चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता . त्याच वेळेला सेट मॅक्स हे चॅनेल सुरु झाले होते .

Suryavansham


सेट मॅक्स या चॅनेलची मार्केटिंग हेड असणारी वैशाली यांनी खरे कारण सांगितले आहे . त्या म्हणाल्या कि , जेव्हा चॅनेल सुरु झालं तेव्हाच सूर्यवंशम या चित्रपटाचे १०० वर्षासाठीचे हक्क विकत घेतले गेले होते . कारण चॅनेलला वाटले होते कि यात अमिताभ बच्चन,अनुपम खेर, कादर खान यांसारखे दिग्गज कलाकार होते . तेव्हा चॅनेलला वाटले कि हा चित्रपट हिट जाईल . पण तसे नाही होऊ शकले . आता सेट मॅक्सने या चित्रपटाचे १०० वर्षांसाठी हक्क विकत घेतले आहे . त्यामुळे अजून ८१ वर्ष हा चित्रपट सेट मॅक्स वर दाखवतच राहतील .