Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

अप्रतिमच - भेटा फोटोशॉपच्या महागुरुला लहानपणीच्या फोटोंमध्ये स्वतः गेला घुसून !

This Man Is King Of Photoshop


असं म्हणतात कि लहानपणीच्या आठवणी नेहमीच स्मरणात राहतात . प्रत्येकाला वाटत कि लहानपण परत यावं . न अभ्यासाची काळजी होती न नोकरी मिळण्याची फक्त मस्ती करायची . पण एक व्यक्ती असा आहे जो आपले फक्त लहानपण नाही तर तरुणपण  पण जगत आहे . म्हणजे लहानपण आणि तरुणपण एकत्र जगत आहे . फक्त जगत नाही आहे तर साऱ्या जगाला दाखवत पण आहे .

लहानपण आणि तरुणपण एकत्र 


This Man Is King Of Photoshop


हा कारनामा कॅनडातील मँट्रियलमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने केला आहे . याचे नाव कॉनर निकर्सन आहे . याने फोटोशॉपचा वापर करून स्वतःला आपल्या लहानपणीच्या फोटोंमध्ये फिट केले आहे . तो आपल्या लहानपणात घुसला आहे . या पद्धतीचा वापर इतका स्पष्ट आणि बारीक केला आहे कि बघणारा आश्चर्यचकित होऊन जाईल . त्यामुळे त्यांचे कलाकारीवाले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .

फोटोशॉपचा महागुरू 


This Man Is King Of Photoshop


कॉनर निकर्सनला फोटोशॉपचा महागुरू म्हटलं जात आहे . ते इतक्या बारकाईने एका फोटोत दुसरा फोटो मिसळतात कि ह्या फोटोत कुठल्याही प्रकारची छेडछाड केली आहे हे समजूनसुद्धा  येत नाही . कॉनर यांना आपल्या लहानपणाची खूप आठवण येते . मग त्यांना मनात विचार आला कि आपण आपल्या फोटोशॉपच्या कलाकारीचा वापर करून आपल्या लहानपणीच्या फोटोंमध्ये सामावून जाऊ . मग काय त्यांनी आपले जुने जॅकेट ,टोपी आणि कपडे शोधून आणले आणि मग सुरु केला जगातला सर्वात अजब फोटो प्रोजेक्ट .

लहानपणात सामावले तरुण कॉनर 


This Man Is King Of Photoshop


कॉनर ने काही असे फोटो बनवले आहेत जे त्यांच्या लहानपणीचे आहे जेव्हा ते ३ ते ४ वर्षांचे होते . विशेष गोष्ट ही आहे कि त्या फोटोंमध्ये कॉनरचे लहानपण आणि तरुणपण हे दोन्ही एकत्र दिसत आहे . फोटो बघून तुम्ही म्हणाल कि पितापुत्र मिळून आजीचा वाढदिवस साजरा करत आहे . पण येथे तर लहान मुलं आणि तरुण मुलगा दोन्हीही कॉनरच आहे . आहे कि नाही कमालची कलाकारी !!!

अनेक तासांच्या मेहनतीचं फळ 


This Man Is King Of Photoshop


आपल्या प्रोजेक्टच्या बाबतीत बोलताना कॉनर म्हणाले  कि त्यांना लहानपण पुन्हा जगायचे होते . त्यांनी स्वतःला आपल्या लहानपणाच्या क्षणांमध्ये मिसळ्यासाठी खूप मेहनत केली आहे . त्यांना अडचणी आल्या त्या म्हणजे जुने फोटो आणि नवीन फोटो यांच्या क्वालिटी मॅच करण्यामध्ये आल्या . त्यासाठी त्यांना अनेक तास लागले पण त्यांनी ते शक्य करून दाखवले .

सगळ्यात खास आहे हा फोटो 


हा फोटो बघा या दोन कॉनर दिसत आहे . एक लहानपणीच आणि एक तरुणपणीचा आहे . लहानपणीचा गायक आहे तर तरुणपणीच गिटारवादक आहे . विचार करा कि या फोटोत कॉनरने स्वतःला कसे फिट केले असेल . दोघांची जुगलबंदी कमालीची आहे .

कुठून मिळाली प्रेरणा 


This Man Is King Of Photoshop


कॉनर सांगतात कि त्यांना असे काहीतरी करून दाखवायचे होते कि लोकांना विश्वास बसेल कि ते आपलं लहानपण पुन्हा जगू शकतात . त्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली . ते सलग फोटोशॉपवर काम करत होते . सध्या ह्या फोटोंमुळे ते सोशल मीडियाचे स्टार बनले आहेत . त्यांना फोटोशॉपचे महागुरू म्हटले जात आहे . लोक त्यांच्याशी संपर्क करत आहे त्यांना यासारखे स्वतःचे फोटो बनवून घ्यायचे आहेत .