Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

वेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार !


तुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते . जोपर्यंत आपण बघतो तोपर्यंत तो तारा निघून जातो . आज आपण चर्चा करणार आहोत अशाच काही बॉलिवूडमधील सिताऱ्यांची जे थोडा काळ आपल्या समोर आले आणि नंतर या जगाचा निरोप घेऊन निघून गेले . यात तुमचे काही आवडते कलाकारदेखील असतील . चला मग जाणून घेऊया या कलाकारांविषयी ज्यांनी फार कमी काळात लोकांच्या मनात घर करून बसले आणि नंतर लवकरच या जगाचा निरोप घेऊन गेले .

१. विनोद मेहरा 

Vinod Mehara


हिंदी चित्रपटसृष्टीत विनोद मेहराच नाव आज पण एक उत्कृष्ट कलाकार म्हणून घेतले जाते. तरीपण त्यांचं आयुष्य जास्त मोठं नव्हतं . फक्त ४५ वर्षाच्या वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला .

२. निर्मल पांडे 


Nirmal Pande


निर्मल पांडे यांनी मोजक्याच चित्रपटात काम केले . पण प्रत्येक पात्राद्वारे त्यांनी लोकांवर आपली एक वेगळी छाप पाडली . वयाच्या ४८व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला .

३. स्मिता पाटील 


Smita Patil


स्मिता पाटील यांचं फिल्मी करियर फक्त १० वर्षांचं होत . इतक्या कमी वेळातदेखील त्यांनी लोकांवर आपला ठसा उमटवला . हिंदी बरोबरच त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतही खूप नाव कमावले . पण वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षीच त्या स्वर्गवासी झाल्या .

४. अमजद खान 


Amjad Khan Sholey


अमजद खानशिवाय शोलेची कल्पना करणेदेखील अवघड आहे . गब्बरच्या रोलमध्ये जीव ओतणारे अमजद खान जास्त आयुष्य घेऊन नव्हते आले . वयाच्या ५२व्या वर्षीच ते या जगाला सोडून गेले .

५. लक्ष्मीकांत बेर्डे 


Lakshmikant Berde


लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती . ते महाराष्ट्राचे सुपरस्टार होते . मराठीसोबत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टी पण गाजवली होती . पण वयाच्या अवघ्या ५०व्या वर्षी त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला होता .

६. संजीव कुमार 


Haribhai Jariwala


मोठ्या पडद्यावर आपल्या कलाकाराची छाप पाडणारे संजीव कुमार जगण्याच्या लढाईत खूप लवकर हरले . वयाच्या ४७ वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला .

७. तरुणी सचदेवा 


Taruni Sachdeva


अमिताभ बच्चन यांच्या पा या चित्रपटात झळकलेली बालकलाकार तरुणी सचदेवा हिचा नेपाळमध्ये विमानअपघातात मृत्यू झाला . तरुणीला रसना गर्ल या नावानेदेखील ओळखतात .

८. मधुबाला 


Madhubala


मधुबाला ही बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री होती जिच्या सौंदर्याचे सर्वच चाहते होते . मुघल ए आझम मध्ये त्यांचं काम अप्रतिम होता . कोणी म्हणणार पण नाही कि त्यावेळेला त्या आजारी होत्या . त्या वयाच्या ३६व्या वर्षीच हे जग सोडून गेल्या .

९. मीना कुमारी 


Meena Kumari


मीना कुमारी यांनी चित्रपटांमध्ये जसे दुःखभरे पात्र निभावले आहेत तसेच त्यांचे आयुष्य पण दुःखाने भरलं होत . मीना कुमारी यांनी वयाच्या ३९व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला .

१०. आदेश श्रीवास्तव 


Aadesh Shrivastava


संगीत दिग्दर्शक आदेश श्रीवास्तव यांनी बॉलीवूडला अनेक उत्कृष्ट गाणे दिले आहेत . त्यांच्या आवाजाची जादू अजूनही लोकांच्या मनात कायम आहे . वयाच्या ५१व्या वर्षी कॅन्सरमुळे त्यांचा मृत्यू झाला .