Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

जाणून घ्या ह्या वस्तूंच्या खऱ्या वापराविषयी जे तुम्हाला माहित नसेल !

 
आपण आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टींना बघता बघता मोठे झालो आहोत . त्यांना नजर अंदाज करत आपण पुढे जात गेलो . त्या वस्तूंचा वास्तव जीवनात नेमका काय फायदा आहे हे आपण जाणूनच नाही घेतले . जसे कि जीन्सचा एक्सट्रा खिसा किंवा टूथपेस्टचा कलर बार . प्रत्येक गोष्टीच्या असण्यामागे एक कारण आहे . आज आम्ही तुम्हाला वस्तूंचा असा उपयोग सांगणार आहोत जो तुम्हाला माहित नसेल .

१. कीबोर्ड बम्प्सकीबोर्ड वर आपण बघतो कि F आणि J थोडेशे वर आलेले दिसतात . तुम्हाला माहिती आहे का कि ते असे का असतात . हे खरतर वापरणाऱ्याच्या मदतीसाठी बनवले आहेत . म्हणजे ते कीबोर्ड कडे न बघता  पोसिशन घेऊ शकतील .

२. टूथपेस्ट मध्ये कलर बार 
तुम्हाला दिसेल की प्रत्येक टूथपेस्टच्या ट्यूबमध्ये एक कलर बार आहे. खरं तर, टुथपेस्टच्या नलिकेत, हे रंग बार केवळ मॅन्युफॅक्चरिंगच्या उद्देशासाठी ठेवले आहे. फॅक्टरीत त्याचा उद्देश केवळ इतका आहे कि  ऑप्टिकल स्कॅनर सांगणे आहे कि ट्यूबचा शेवट कुठे  आहे जेणेकरून पुढे जाण्यापूर्वी त्याला सीलबंद करता येईल. म्हणजे पुढे जाण्यापूर्वी त्याला सीलबंद केले जावे .

३. पॉटच्या हँडलमध्ये छिद्र 


जर तुमच्या पॉटच्या हँडलला छिद्र आहे तर तुमच्याकडे रेडिमेड चमच्याचे होल्डर आहे . तुम्ही फक्त चमच्याला त्या पॉटच्या हँडलमध्ये टाकून द्या . त्याचा वरील भाग हवेत लटकत राहील .

४.  छोटा बकल 
तुम्ही पण जर जीन्स घालता तर मग तुम्ही हे बटण पाहिलं असेल . सुरुवातीला जेव्हा जीन्स बनवली गेली तेव्हा जास्त करून मजूर लोक ती परिधान करत होते . त्यांना बऱ्याचदा नवीन जीन्स विकत घ्यावी लागत असे . कारण जुन्या जीन्स उघडून जायच्या . त्यामुळे जीन्सवर हे छोटे बटण लावू लागले . त्यामुळे ते कापड धरून ठेवेल . हे छोटे बटन जीन्स जास्त काळ टिकवण्यासाठी उपयोगी आहे .

५. कुलुपात छोटे छिद्र 
कुलुप हे वेगवेगळ्या आकारांमध्ये येतात . ते वेगवेगळ्या रांगांमध्ये पण येतात . जर तुम्ही कुलूपाकडे नीट निरीक्षण केले तर आपल्याला एक छोटेसे छिद्र दिसेल . हे छिद्र कुलुपात धूळ आणि पाणी बाहेर जाण्यासाठी बनवले आहेत . याचा उपयोग कुलुपाच्या तेलपाणी करण्यासाठी केला जातो .

६. पेनच्या कॅपमध्ये छिद्र 
प्रत्येक जण हा पेनचा वापर करतो . काही लोकांना पेनचे  टोपण चावण्याची सवय असते . झाकणातील या छिद्राला सुरक्षेच्या हेतूने बनवलं आहे . जर कोणी त्या झाकणाला गिळलं आणि ते जर घश्यात अडकलं तर त्या छिद्राने मदत होईल.