Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

कोण आहेत संभाजी भिडे गुरुजी ?

 
नाव: श्री.संभाजीराव भिडे गुरुजी
वय: ८४
शिक्षण: एम.एस्सी. Atomic Science (Gold Medalist)
पूर्वाश्रमीचे काम: फ़र्गसन महाविद्यालयात फिजिक्स चे प्राध्यापक
पूर्वाश्रमीची सांपत्तिक परिस्थिती : सातारा जिल्ह्यातील वारुगड किल्ल्याचे वंशपरंपरागत सबनीस (पायथ्याच्या शेकडो एकर जमीनी आजही नावावर) पुण्यात आज अब्जात मूल्य असलेला भूखंड नोकरीत असताना आईचे नावावर घेतलेला
सध्याचे काम: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून समर्थांना अपेक्षित महंत व शिवपाईक घडविण्याच्या कामात गेली ६ दशके पूर्णवेळ कार्यरत.
संपत्ती: एक धोतर-सदरा-टोपी अंगावर, एक दोरीवर, एक सतरंजी, १०x१० ची एक खोली, भेट मिळालेली पुस्तके आणि यांच्या एका हाकेवर धाऊन येण्यास सिद्ध असलेले १० लाख सत्शील, सद्विचारी, सदाचरणी, सद्वर्तनी, निर्व्यसनी तरुण !
दिनचर्या: आजही रोज १५० जोर, १५० बैठका आणि १५० सूर्यनमस्कार स्वत: घालतात, केवळ सायकल व लाल बसने प्रवास. अखंड भ्रमंती, एकवेळ जेवण, तेही मिळाले तरच...


संपर्क: कधीही, कुठेही, अगदी सहज कुणालाही भेटतात. अपोइंटमेंट लागत नाही. अंगात धग, रग, उर्मी शिल्लक असल्याने अंगरक्षक लागत नाहीत!  एकटेच फ़िरतात! शिवप्रभूंच्या स्पर्शाने पावन भूमीला पादत्राणे न लागोत म्हणून अनवाणी फ़िरतात! गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी ही पोस्ट आम्ही टाकतो आहोत कारण आम्हाला माहित आहे, खरे कार्य प्रकाशित करण्यात "धंदेवाईक" लोकांना व माध्यमांना रस नसतो.. सर्व शिवभक्त, शिवप्रेमी, शिवश्री, शिव"हे", शिव"ते" आपापल्या घरात,किंवा वातानुकुलीत कार्यालयांत, किंवा वातानुकुलित वहानात शांतपणे विसावलेले आहेत... त्याच वेळी एक ८४ वर्षांचा म्हातारा "युवक", शिवरायांच्या रक्ताचा तरुण घडावा, यासाठी त्याने सह्याद्रीत शिवपाईक बनून जाणे आवश्यक आहे हे जाणून पुढच्या मोहिमेच्या आखणीसाठी स्वत: पायपीट करतो आहे!
लाखोंच्या संख्येने मोहीमेत येणा-या तरुणांना अपाय न व्हावा यासाठी आधी स्वत: सर्व परिसर, मार्ग नजरेखालून, पावलाखालून घालतो आहे. पावलाखाली थेट तापलेला डांबरी रस्ता! डोक्यावर आग ओकणारा भास्कर!
पण दोहोंना या शिवतपस्वींच्या तपाचे चटके बसत असणार खास! तपच असे! आगच अशी! धमकच अशी! की काळानेही यांचे चरणी लोटांगण घालावे! गुरुजींचा श्वाससुद्धा नेहमी फक्त श्री शिवाजी व श्री संभाजीच उच्चारतो..

टीप  : सदरहू पोस्ट हि शिवप्रतिष्ठानच्या अधिकारीक फेसबुक पेज साभार वरून घेण्यात आली आहे, ह्यातील माहिती हि त्या पेज द्वारे प्रसिद्ध केली असून आम्ही फक्त दाखला देत आहोत.