Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

भिडे गुरुजींना संरक्षण ! ५ पोलीस आहेत २४ तास सोबत ..

भिडे गुरुजी

मागील गेल्या दिवसात भीमा कोरेगाव येथे झालेल्या भीषण घटनेमुळे महाराष्ट्रातील वातावरण बरेच पेटले आहे . मराठा आणि महार यांच्यात हा वाद निर्माण झाला आहे . दगडफेक जाळपोळ यासारखे अनिष्ट प्रकार घडले . जे खरं तर व्हायला नको होते . त्यामुळे या घटनेनंतर एक दिवस संपूर्ण बंद देखील पाळला गेला होता . हा बंद प्रकाश आंबेडकर यांनी पुकारला होता . तेव्हा प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव येथील रहिवासी असणारे संभाजी भिडे यांच्यावर या सर्व घटनेचा आरोप लावला आहे . त्यांचे असे म्हणणे आहे कि या घटनेला संभाजी भिडे हेच जवाबदार आहेत .

संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी  हे शिवप्रतीष्ठान याचे अध्यक्ष आहेत . या सर्व झालेल्या घटनेमुळे तेथील जिल्हा पोलिसांनी भिडे गुरुजींना पोलीस संरक्षण दिले आहे . ५ पोलीस २४ तास त्यांच्याबरोबर असतील . कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांना हे पोलीस संरक्षण देण्यात आले आहे . तरीपण भिडे गुरुजी यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे अशी विनंती केली होती कि मला कुठल्याही पोलीस संरक्षणाची गरज नाही आहे . पण परिस्थिती सध्या अशी आहे कि काहीही घडू शकते त्यामुळे इच्छा नसताना पण भिडे गुरुजींना हे पोलीस संरक्षण घ्यावे लागले आहे .

भिडे गुरुजी

सध्या संभाजी भिडे यांना ५  पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला आहे . हे पोलीस साध्या वेशात असतील . ज्यावेळेला शिवप्रतिष्ठान यांनी जेव्हा मोर्चा काढला होता तेव्हा पण पोलिसांनी साध्या वेशात असताना संरक्षण दिले होते . सध्यातरी त्यांना २४ तास बंदोबस्त देण्यात आला आहे .