Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

हि कामे करत असतो भारताचा पहिला समलैंगिक राजा !आता आपल्या देशात पश्चिमी सभ्यता पसरत चालली आहे . स्त्री आणि पुरुष यांच्यातील शारीरिक संबंध होणे काही मोठी गोष्ट नाही राहिली आहे . जगात बरेचशे पुरुष महिलांमध्ये रुची नाही दाखवत . समलैंगिकता कायद्याने गुन्हा आहे का नाही हे कोणी समजू शकलेलं नाही . सुप्रीम कोर्टाकडे  दोन व्यक्तींच्या सहमतीने बनलेल्या समलैंगिक संबंधाला अपराध न मानण्याची मागणी केली आहे . आज आम्ही तुम्हाला समलैंगितेच्या संबंधित एका भारतीय राजकुमाराची कहाणी सांगणार आहोत . याने सगळ्यांसमोर आपण गे असल्याचा स्वीकार केला आहे .या राजकुमारांचा जन्म गुजरातमधील नर्मदा नदीच्या जिल्ह्यात झाला होता . राजकुमार मानवेंद्र आता फक्त देशात नाही तर विदेशात पण ओळखले जाऊ लागले आहेत . मानवेंद्र हे देशातील पहिले राजकुमार आहेत ज्यांनी आपण गे असल्याचा सगळ्यांसमोर स्वीकार केला आहे . राजकुमार हे भारतातील अन्य गे लोकांसाठी काही न काही मदत करत असतात . मानवेंद्र यांनी राजपिपला म्हणजे गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील नगरमध्ये समलैंगिकांसाठी वृद्धाश्रम स्थापन केले आहे . या वृद्धाश्रमाची नाव अमेरिकन लेखिका जेनेट यांच्या नावावरून ठेवले गेले आहे . हा वृद्धाश्रम आशिया खंडातील पहिला गे आश्रम आहे .२३ डिसेंबर १९६५ ला राजस्थानमधील अजमेर शहरात मानवेंद्र यांचा जन्म झाला होता . लहानपणी ते इतर मुलांप्रमाणेच राहत होते . मानवेंद्र यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईमधील स्कॉटिश स्कुल येथे पूर्ण केले आणि महाविद्यालयीन शिक्षण अमृतबेन जीवनलाल कॉलेज येथे पूर्ण केले . १९९१ साली मानवेंद्र यांचे लग्न मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या चंद्रेश कुमारी हिच्याशी झाले होते . लग्नाच्या १ वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात जणू वादळ आले  आणि त्यामुळे हे दोघे १९९२ ला  वेगळे झाले . मानवेंद्र यांच्या लग्न मोडण्याचं मुख्य कारण त्यांचं समलैंगिक असणं सांगितलं जात होत .

मिळालेल्या बातमीनुसार मानवेंद्र यांच्याद्वारे स्थापित वृद्धाश्रमासाठी अमेरिकन लेखिका जेनेट हिने सर्वात जास्त रक्कम दान केली होती . जेनेटच्या इतक्या मोठ्या दानानंतर इतर लोक तिला पण गे च्या नजरेने बघायला लागले होते . त्यानंतर मानवेंद्रने सांगितले कि जेनेट समलैंगिक नाही आहे तरीपण त्यांनी आश्रमासाठी सर्वात अधिक योगदान दिले . त्यामुळेच आश्रमाचे नाव जेनेटच्या नावावर दिले गेले .मानवेंद्र यांनी सांगितले कि त्यांना आश्रमाची कल्पना २००९ मध्ये सुचली होती तेव्हापासूनच ते त्याच्या तयारीला लागले होते . आश्रमाचे काम पूर्ण झाल्यावर त्याचे उदघाटन अमेरिकन लेखिका यांची बहीण कार्लाफाइन हिच्या हस्ते करण्यात आले . या आश्रमात ५० पेक्षा जास्त गे लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली गेली आहे . त्यांच्या मनोरंजनासाठी स्विमिंगपूल पण बनवला गेला आहे .