Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

DSK नी फेसबुकवर केले अखेर हे धक्कादायक आवाहन !

लोकांना शेकडो कोटी परत देण्याच्या अडचणींचा सामना करत असलेल्या दीपक कुलकर्णी ह्या पुण्यातील नामांकित बिल्डर ह्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून अखेर लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. ह्या त्यांच्याच समर्थनार्थ काढलेल्या पेजवर असलेला मेसेज डीएसकेंनी आपल्या अधिकृत पेजवर शेयर केला !

पेजवर शेयर केलेला मेसेज खालील प्रमाणे जसाचा तसा .. 

 

डीएसकेंना मदत करणं, हे माझं ‘कर्तव्य’ आहे.
==============================
मी डीएसकेंचा कर्मचारी नाही.
मी डीएसकेंचा ग्राहक नाही.
मी डीएसकेंचा ठेवीदार नाही.
--------------------------------
मी आहे, एक मराठी माणूस
--------------------------------
ज्याला...डीएसकेंनी उद्योगाची दिशा दाखवली. शिक्षण नसतानाही भरारी घेण्यास शिकवलं. आव्हानं कशी पेलायची हे दाखवलं. आणि सच्चेपणानं वागण्याची रीतही शिकवली. डीएसके या एकाच माणसामुळे मराठी माणसाच्या काही पिढ्यांनी पहिल्यांदा नोकर्‍या सोडल्या आणि उद्योगधंद्यात जगभरात आपला दबदबा निर्माण केला.

जेव्हां जेव्हां मंदीची लाट आली, तेव्हां डीएसकेंनी आपलं जहाज पुढं लोटलं आणि त्याआधारे कित्येकांनी तग धरला. कित्येकांची घरं सावरली. डीएसकेंनी खोटी स्वप्नं दाखवली नाही तर मोठी स्वप्नं पाहण्याचं धाडस मराठी माणसात निर्माण केलं.
‘घराला घरपण देणारा’ हा माणूस पहिल्यांदा उभा राहिला, तेव्हां सामान्य मराठी माणूस वाड्यातून-चाळीतून फ्लॅटमध्ये गेला. मराठी माणूस फॉर्च्युनर/लँडक्रूझरमध्ये फिरू लागला. डीएसकेंनी शेतकर्‍याच्या आत्महत्या रोखण्यासाठी,स्वतःच्या खर्चानं रोबोट बनवून दुधातून त्याला फायदा मिळवून दिला. डोनेशन घेऊन ‘शिक्षणसम्राट’ व्हायचं सोडून, डीएसकेंनी मुलांसाठी जगातलं सर्वोत्तम शिक्षण भारतात आणलं. जातीपातीवर दंगली घडणार्‍या या देशात या ब्राह्मणानं दलित पक्षाच्या तिकिटावर निवडणूकही लढवली.
अजून काय पुरावे हवेत, डीएसकेंच्या चांगले असण्याचे?
 
हा माणूस आहे तोपर्यंत मराठी माणूस उद्योगात पुढे जाईल, या एकाच भीतीने डीएसकेंना संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि आम्ही मराठी माणसं काय करतोय तर...भाबडेपणानं या सार्‍यावर विश्‍वास ठेवतोय.
पण एक लक्षात ठेवा, डीएसकेंचा बुरूज ढासळला तर बाकीची तटबंदीही पटापट कोसळणार आहे. पुन्हा मराठी माणसाच्या नशिबी ‘नोकरी’च येणार आहे. हे लक्षात येत असेल तर...आता मात्र मागे राहू नका.
ज्या पैशांसाठी डीएसकेंना आरोपींच्या पिंजर्‍यात उभं केलं जातंय. तो पैसा डीएसकेंच्या पाठीशी उभा करूयात.
डीएसकेंची काही धोरणं चुकली असतीलही, पण हा माणूस चुकीचा नाही.
म्हणूनच मी माझा ‘खारीचा वाटा’ डीएसकेंना देतोय. आणि तुम्ही?...
या पोस्टसोबत असणार्‍या फोटोमध्ये डीएसकेंचे बँक डिटेल्स दिले आहेत. मी माझी मदत भरली आहे. तुम्हीही तुमचा मदतीचा हात पुढे करा.
हा मेसेज इतका शेअर करा की, प्रत्येक मराठी माणसापर्यंत जाईल.
Support DSK, Save Marathi Manus

फेसबुक पेजवर शेयर झालेली इमेज  !