Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा कोणी केले रूपांतर मुंबईतिल घाटकोपर झोपडपट्टीचे - चल रंग दे !ग्रे-गडद हे असे शब्द आहेत जे मुंबईतील झोपडपट्टीचा विचार करताना मनात येतात . जणू काही ती ह्या भागाची ओळख झाली आहे . पण आता काही शहरातील तरुणांनी हा दृष्टिकोन बदलण्याचा निर्धार केला आहे आणि यावेळेस त्यांनी त्यांचं हत्यार निवडलं आहे रंगांना . या उपक्रमाचं नाव आहे 'चल रंग दे' . मुंबई शहरातील अशा प्रकारचे हा पहिलाच उपक्रम आहे . हा उपक्रम राबवला गेला आहे मुंबईतील घाटकोपर येथील झोपडपट्टी मध्ये . त्यामुळे लोकांचा झोपड्पट्टीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे .फोरबॉवल डिजिटलने मुंबई मेट्रो वन, स्नोसेम पेंट्स आणि कंपनीलॅब. ऑरेटरी एशिया यांच्या सहकार्याने या पुढाकाराचे समर्थन केले आहे. डिप्पीया रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले आहे .  खरं तर, चल रंग दे - टीमने पूर्वी घाटकोपरमधील असल्फा गावात काही सुंदर, चैतन्यमय रंगांनी चित्रित करण्यात यश मिळवले आहे.शहराचे रूप परिवर्तित करण्यासाठी प्रत्येकाने ब्रश हातात घेतला पाहिजे असे रेड्डी यांनी त्यांना वेबसाईट वर आवाहन केले आहे .समुदायाला रंग द्या ,पर्वतांना रंग द्या ,कारण रंगात बदल करण्याची शक्ती आहे . काही लोकांनी विचारले कि रंग दिल्याने काय फरक पडेल ? तेव्हा रेड्डी यांनी सांगितले कि रंग हे आनंदाची ओळख करून देतात ,आणि एक आशा देतात कि सर्व काही ठीक होऊन जाईल . एक लहान बदलसुद्धा खूप मोठा प्रभाव पडू शकतो . जरी हा प्रयत्न हास्यास्पद असला तरी त्याचा परिणाम प्रभावी आहे .
काहीही असो पण हा उपक्रमामुळे लोकांचा झोपड्पट्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल .