Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

हॉटेल मध्ये चांदीचे चमचे चोरतांना पकडले ममता बॅनर्जीसोबत इंग्लंडला गेलेल्या २ पत्रकारांना !

आजकाल कोणताही मोठा नेता परदेश वारीला जातो तर सोबत एक पत्रकारांचा चमू असतोच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्या परंपरेला खीळ दिली असली तरी इतर सर्वच नेते सोबत सरकारी पैश्यात पत्रकारांना सोबत नेत असतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील ह्याला अपवाद नाही. असाच त्यांनी परदेशी गुंतवणूक बंगाल मध्ये व्हावी म्हणून युरोप दौरा आयोजीत केला होता. त्यांच्या दौऱ्यामध्ये अनेक पत्रकार देखील होते. 
लंडन येथे असतांना एका वरिष्ठ भारतीय पत्रकारास हॉटेलमधील चांदीचे चमचे चोरल्याचे हॉटेल प्रशासनास निदर्शनास आले आणि ह्या प्रकरणी ५० पौंड म्हणजे सुमारे 4,300 रुपये दंड करण्यात आल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. ममता बॅनर्जी यांच्यासमवेत असलेल्या काही भारतीय पत्रकारांनी या हॉटेलमधील आयोजित औपचारिक भोजनावेळी संधी साधून हळूच टेबलवरील चांदीचे चमचे बॅगमध्ये ठेवले. मात्र त्यांचे लज्जास्पद कृत्य सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्यानंतर तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांकडून त्यांना समज देण्यात आली. यामुळे लज्जित झालेल्या या पत्रकारांनी चमचे पुन्हा टेबलवर ठेवले. हा भोजन समारंभ एका परदेशी शिष्टमंडळासमवेत होता. भारत व ब्रिटनमधील महत्त्वपूर्ण राजकीय नेते, उद्योगपती आणि पत्रकार यावेळी उपस्थित होते.
परंतु एका पत्रकाराने हुशारी करत चांदीचा चमचा दुसऱ्याच्या बागेत ठेवला आणि त्याने चोरीची कबुली देण्यास मज्जाव केला पण जेव्हा सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले तेव्हा मात्र त्याची नाचक्की झाली. आजकाल न्यूजचे दीपांकर नंदी हे त्या पत्रकाराचे नाव असल्याचे समजते. तर हा आहे आपला ४था स्तंभ, कोणावरहि टीका करणाऱ्या पत्रकारांना आत्मपरीक्षणाची गरज आहे हे नक्की.