Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

राज्याचे खेळाचे भविष्य जनरल बोगीतून दिल्लीला खेळ स्पर्धेस रवाना !


आज महाराष्ट्रातील खेळाडू हे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले आहेत . महाराष्ट्रातील खेळाडूंचा स्तर पाहिल्यापेक्षा खूप वाढला आहे . आपल्या महाराष्ट्राचे नाव पुढे नेण्यासाठी हे खेळाडू जीव तोडून खेळतात . पण राज्य सरकार यांच्याकडे पाहिजे तस लक्ष देत नाहीये . त्यांना ज्या सोयीसुविधा मिळायला हव्यात त्या मिळत नाही आहे . राज्य सरकार याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे . आता काही दिवसांपूर्वीची घटना बघा .३ जानेवारी ते ९ जानेवारी २०१८ यादरम्यान छत्रसाल दिल्ली येथे राष्ट्रीय शालेय स्पर्धा सुरु होणार होती . या शालेय स्पर्धेसाठी जे विद्यार्थी महाराष्ट राज्याचे प्रतिनिधित्व करणार होते त्यांचे साधे स्लीपर कोचचे  रिझर्वेशन पण केलेलं नव्हते . ते खेळाडू जेव्हा रेल्वे स्टेशन वर आले तेव्हा त्यांना कळले कि आपले स्लीपर कोचमध्ये रिझर्वेशन केलेले नाही . तेव्हा मग त्यांना नाईलाजाने जनरलच्या डब्याने प्रवास करावा लागला . ते पण  पुणे ते दिल्ली असा प्रवास होता . काही मुले फरशीवर झोपली होती होती तर काही दरवाज्याजवळ झोपली होती . इतक्या कडाक्याच्या थंडीत देखील त्यांना बसायला पण जागा नाही मिळाली . बघा काय अवस्था झाली होती मुलांची .त्या खेळाडूंना दिल्लीला पोहोचल्यानंतर खेळामध्ये सहभागी व्हायचे होते . त्यामुळे त्यांचा प्रवास आरामदायी होणे गरजेचे होते . पण पुणे ते दिल्ली त्यांना अतिशय खडतर प्रवास करावा लागला . महाराष्ट्र शासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले होते . जर ते प्रवासाने दमून गेले तर मैदानावर खेळ कस काय खेळू शकतील . शासनाने खेळाडूंच्या सोयीnसुविधांकडे लक्ष द्यायला हवे . जे खेळाडू आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांना वेळोवेळी सोयीसुविधा पुरविणे हे  शासनाचे कर्तव्य आहे . ही काही पहिली वेळ नाही आहे . अशा घटना याआधी पण घडल्या आहेत . त्यामुळे आता शासनाने या परिस्थीकडे कानाडोळा न करता योग्य ती पावले उचलली पाहिजेत .