Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा काय होत्या आणि काय झाल्या ह्या मराठी अभिनेत्र्या !


आज आपण काही सदाबहार मराठी अभिनेत्रींनविषयी जाणून घेणार आहोत . या अभिनेत्रींनमुळे मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आले होते . या अभिनेत्रींनमुळे मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा उंचावला होता . चला मग जाणून घेऊया कोण आहेत या अभिनेत्री

१. वर्षा उसगावकर
वर्षा उसगावकर यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९६८ ला झाला होता . यांचा पहिला चित्रपट गंमत जम्मत हा होता . हा चित्रपट सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केला होता . या चित्रपटाद्वारे वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले . त्यांनतर त्यांनी लपंडाव,अफलातून,माल मसाला,हमाल दे धमाल यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले .

२. रेणुका शहाणेरेणुका शहाणे यांचा जन्म ७ मार्च १९६५ ला झाला होता . यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे . त्यांचा सर्वात जास्त गाजलेला चित्रपट म्हणजे हम आपके है कौन. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली . त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध अभिनेता आशुतोष राणा यांच्याशी विवाह केला . आता त्यांना शौर्यमान आणि सत्येन्द्र नावाची दोन मुले आहेत .

३. निवेदिता सराफ६ जून १९६५ ला यांचा जन्म झाला होता . घरचा भेदी, नवरी मिळे नवऱ्याला, धुमधडाका, थरथराट, तुझी माझी जमली जोडी, तू सुखकर्ता यांसाख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम अभिनय केला . त्यानंतर काही काळाने त्यांनी प्रसिद्ध अभिनेता निवेदिता सराफ यांच्याशी विवाह केला .

४. अलका कुबलअलका कुबल यांचा जन्म २३ सप्टेंबर १९६५ ला मुंबई मध्ये झाला . स्त्रीधन या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता . त्यानांतर त्यांनी लेक चालली सासरला, तुझ्यावाचून करमेना , माहेरचा आहेर , काळूबाईच्या नावानं चांगभलं, सुवासिनीची सत्वपरीक्षा, अग्निपरीक्षा यासारखे अनेक चित्रपट केले . पण त्यांना सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली ती माहेरची साडी या चित्रपटाने . या चित्रपटाने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली .

५. प्रिया बेर्डेयांचा जन्म १७ ऑगस्ट १९६७ ला त्यांचा जन्म झाला . अशी ही बनवाबनवी या धमाल चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते . त्यानंतर त्यांनी एक गाडी बाकी अनाडी, घनचक्कर, बजरंगाची कमाल,देवा शप्पथ खोटे सांगेन खरं सांगणार नाही यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला . लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर त्यांनी अशी जोडी जमली या चित्रपटात काम केले आणि नंतर खऱ्या आयुष्यात पण त्यांची जोडी जमून गेली . प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी विवाह केला . त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे .