Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मुसलमान असूनही गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या नातीची लग्नपत्रिका संस्कृत भाषेत !

 

सोलापूर येथील प्रसिद्ध संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी त्यांची नात डॉ. समीन हिची लग्नपत्रिका संपूर्ण संस्कृत भाषेत छापली आहे. आजकाल हिंदू देखील मराठी मधेच लग्न पत्रिका छापतात पण एक मुस्लिम धर्मीय असून पण श्री गुलाम दस्तगीर बिराजदार ह्यांनी हे पाऊल उचल्याने एक सुखद आनंदाचा धक्का संस्कृत प्रेमी लोकांमध्ये निर्माण झाला आहे. संस्कृत संवर्धनासाठी बिराजदार ह्यांच्या साऱख्या अनेक लोकांनी आपले आयुष्य वेचले आणि त्याचीच पुढची पायरी हा स्तुत्य उपक्रम बघितला पाहिजे ! शहरामध्ये तर अगदी इंग्लिश मध्ये लग्नपत्रिका छापायचा ट्रेंड निर्माण झाला आहे ह्यातून शहरी लोक काही प्रेरणा घेतील का हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. 


कन्या डॉ शमीन ह्यांचा विवाह डॉ मुहम्मद रिजवी ह्यांच्याशी ८ तारखेला सोलापूर नगरी मध्ये संपन्न होणार आहे जो ह्या पत्रिकेमुळे एक चर्चेचा विषय बनला आहे हे नक्की !