Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नका, काहीही करा पण मला लवकर मंत्री करा - माजी मुख्यमंत्री नारायण राणे

माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नका, काहीही करा पण मला लवकर मंत्री करा, असे साकडेच मंत्रिमंडळ प्रवेशाचा मुहूर्त लांबत चालल्याने हताश झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले.
काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा गेल्या सप्टेंबर महिन्यात दिलेल्या राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन मंत्री करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण भाजपकडून राणे यांची पदोपदी अडवणूक करण्यात आली आहे. भाजपमध्ये राणे यांना अधिकृतपणे प्रवेश देण्यात आला नाही. कदाचित संघाने मध्ये आडकाठी घातली असावी म्हणून त्यांनी अखेर स्वतंत्र पक्ष स्थापन करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याची अट घालण्यात आली. त्यानुसार राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर देखील केला. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत राणे यांना उमेदवारी किंवा पाठिंबा देण्याचे भाजपने टाळले. शिवसेना नाराज होईल म्हणून राणे यांचा पत्ता कापण्यात आला. पुन्हा आमदारकी मिळविण्यासाठीही राणे यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. नाशिकला त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल असे देखील सांगण्यात येत आहे.

मंत्रिमंडळात समावेश करण्याचे राणे यांना आश्वासन देण्यात आले असले, तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्यात येत आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत राणे यांची नाराजी दिसून आली. २०१८ सुरू झाले, मग तुमचा मंत्रिमंडळातील समावेश कधी, या प्रश्नावर राणे यांनी माझी सहनशीलता संपण्यापूर्वी निर्णय घ्यावा, असे उद्गार काढले. यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात व राणे नक्की कधी मंत्री बनतील जा प्रश्न गुलदस्त्यात आहे.