Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

खासदार उदयन भोसले हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे - निखिल वागळे !

एका वेबसाईटला मुलाखत देतांना आयबीएन लोकमत चे माजी संपादक निखिल वागळे ह्यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावर काही मते मांडली आणि त्यात त्यांनी अनेक मुद्यांना हात घातला. त्यांनी छत्रपती उदयन राजे भोसले ह्यांच्या वर खालील मत व्यक्त केले. आपण जाणताच कि छत्रपती उदयन राजे भोसले ह्यांनी भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. बघा काय म्हणाले वागळे सर,


'मागे एकदा डॉ सुरेश माने माझ्या कार्यक्रमामध्ये आले होते ते असे म्हणाले कि आपण लोकशाही मध्ये राहतो कुणालाही राजे म्हणून म्हणायची गरज नाही आणि मला ते पटत. मी आता पासून उद्यन राजेंना खासदार उदयन भोसले असे म्हणणार आहे. '

ह्यावर पुढे त्यांनी आपले विचार मांडले कि,

'हे जे उद्यन भोसले आहेत, आपण राजेशाही मध्ये राहात नाही तेव्हा स्पष्ट बोलायला हवे, हे खासदार उदयन भोसले जे आहेत ते काय काम करतात मला माहित नाही पण हे सकाळ पासून पूर्ण शुद्धी नसतात हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे. हे शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणवतात पण जर हे असे करत असतील तर हा शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा अपमान आहे . मला असे वाटते कि त्यांना किंमत अश्यासाठी द्यायची गरज नाही कि त्यांनी जातीयवादी राजकारण हे असे कायम केले आहे. शरद पवारांनी उदयन राजेंचे कान ओढले पाहिजे,पण ते कुणाचे ऐकत नाही पूर्वी खून प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप होता त्यांना पोलिसांनी पकडले होते तेव्हा अश्या उदयन भोसले नावाच्या खासदाराला जो गावगुंडासारखे काम करतो कोणी गंभीर पणे घ्यावे असे मला वाटत नाही  '

श्री निखिल वागळे ह्यांची हा एक तासाची मुलाखत मॅक्स महाराष्ट्र ह्या चॅनल अथवा वेबसाईट वर पूर्ण तुम्ही बघू शकता !