Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा का आहे सनी देओल आणि अनिल कपूर मध्ये ३६ चा आकडा !

सुपरस्टार सनी देओल तसे तर शांत अभिनेता आहे पण ह्या शांती मध्ये पण एक वादळ लपलेले असते ज्यासाठी देओल परिवार प्रसिद्ध आहे. सनीच्या ह्या वादळाची जाणीव अनिल कपूर ह्यांना झाली नाही आणि त्यातून निर्माण झाली एका मोठ्या वादंगाची सुरुवात. १९८९ मध्ये आलेल्या जोशिले चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये असलेल्या अनिल कपूर आणि सनी देओल ह्यांच्या मध्ये तेव्हा वादाचा भडका उडाला जेव्हा चित्रपटाच्या क्रेडिट मध्ये अनिल कपूर ह्यांचे नाव सनीच्या आधी दाखवण्यात आले.
 
ह्यावर त्यावेळी धर्मेंद्र ह्यांनी एक तिखट प्रतिक्रिया देत स्पष्ट केले कि सनी हा अनिल पेक्षा नक्कीच मोठा स्टार आहे . तत्कालीन मीडियाने पण हा मुद्दा खूप उचलून धरला आणि गैर समाजाचे एक मोठे वादळ दोन्ही कुटुंबामध्ये घोंगावू लागले. ह्या वादाने चित्रपटाचे शूटिंगला सनीने पुढे नकार दिला पण डायरेक्टर शेखर कपूरने कसे बसे दोघांना समजावून चित्रपट पूर्ण करून घेतला जो यशस्वी पण झाला.
 joshilaay film
ह्याच वर्षी सनी आणि अनिलला राम अवतार चित्रपटासाठी निर्माता सुनील हिंगोरानी ह्यांनी घेतले. हिंगोरानी ह्यांच्याशी असलेल्या आर्थिक संबंधामुळे सनीने ने इच्छा नसतांना होकार दिला . पण शूटिंगच्या अनिल आणि सनी एकदम अबोल होते, शूट झाले कि दोघे गुपचूप मेकअप रूम मध्ये निघून जात. पण एका सिन मध्ये सनी आणि अनिल चा एक फाईट सिन होता ज्या मध्ये सनीला अनिलच्या गळा दाबायचा होता. सिन सुरु झाला, शूट पण झाला पण डायरेक्टरने जेव्हा कट बोलले तरी सनी काही  अनिलला सोडेना शेवट तिथल्या लोकांनी हि झडप सोडवली.
Ram Avtar Film Sunny Deol Anil Kapoor
त्यानंतर एक खूप मोठे मीडिया मधले युद्ध अनिल आणि सनीने लढले, सनीने नेहमीच आपण असे केल्याचे आरोप अमान्य केले आणि आपण जर असे काही केले असते तर अनिल आज मीडिया समोर नसता असे देखील नमूद केले. आज ३० वर्ष झाले पण दोघेही एकपण चित्रपटामध्ये परत सोबत दिसले नाही