Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

आईचे प्रेत सोडून आधी दिला दहावीचा पेपर - बघा ह्या मुलीची संघर्ष कथा !



ही घटना आहे नागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातील धर्मपुरी गावातील . ह्या मुलीचे नाव दीक्षा अरुण लाडेकर असे आहे . ही मुलगी धर्मपुरीमधील विश्व्मेघ या विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे . काल अचानक त्या मुलीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला . काल या मुलीचा इयत्ता दहावीचा विज्ञानाचा पेपर होता . पण नेमका त्याच वेळेला तिच्या आईचा आकस्मिक मृत्यू झाला . तरीही अशा दुःखाच्या प्रसंगी न खचता तिने आईचे प्रेत सोडून तिचा विज्ञानाचा पेपर दिला .

ही मुलगी मूळची वाकेश्वर येथील राहणारी आहे . दीक्षा ही आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे . दीक्षाचा सकाळी ११ वाजता विज्ञानाचा पेपर होता . पण सकाळी ९ वाजता तिच्या आईचा आकस्मिक मृत्यू झाला . त्यामुळे तिच्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला . पहिले ती इतकी दुखत बुडाली होती कि तिलाच समजत नव्हतं कि काय करावे . तिला आईच्या आकस्मिक मृत्यूचा जबरदस्त धक्का बसला . तिला समजत नव्हते कि आता काय करावे . एकीकडे समोर आईचे  प्रेत पडलेले होते आणि दुसरीकडे दहावीचा विज्ञानाचा पेपर होता . तिला गहाण प्रश्न पडला होता .

तरीपण या कठीण परिस्थितीत तिने धीराने अखेर निर्णय घेतला . तिने निर्णय घेतला कि विज्ञानाचा पेपर द्यायला जायचा . तिने वडिलांची परवानगी घेतली आणि मग त्या मुलीने सर्वांना सांगितले कि मी पेपर देऊन आल्याशिवाय आईच्या प्रेतावर अंतिम संस्कार करू नका . विश्व्मेघ विद्यालयाच्या केंद्रावर जाऊन पेपर दिला आणि मग आईचे अंतिम संस्कार केले . दीक्षाच्या आई गेल्याचे दुःख शाळेतही होते पण तिच्या या धैर्याचे कौतुक पण झाले . तिचे धैर्य हे कौतुकास्पद आहे .